Marathi Suvichar | मराठी सुविचार | Positive Suvichar

मराठी सुविचार | प्रेरणादायक सूविचार | शालेय मराठी सुविचार


असं म्हणतात की ज्याचे विचार सुंदर, ज्याची  वाणी सुंदर ,ज्याचे  मन सुंदर, तो मनुष्य ही खूप सुंदर असतो.आपल्या योग्य विचाराने आपले आयुष्य हे घडत असते. जर का मनातच असेल चल बिचल असेल , विचार वाईट असतील तर काय आपल्या सोबत चांगले  होईल, मला सांगा म्हणूनच म्हणते कि  विचार हे चांगलेच असायला हवे.आपल्या  दिवसाची सुरवात हि चांगल्या विचाराने करावी जेणेकरून आपला संपूर्ण दिवस हा चांगला जाईल. त्यासाठी मराठी सुविचार हा उत्तम उपाय आहे.. 
 तर आजच्या लेखांमध्ये आपण शालेय सुविचार, मराठी सुविचार प्रेरणादायी सुविचार बघणार आहोत.



    मराठी सुविचार | Marathi Quotes | Marathi Suvichar


    "अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवाजी व्यक्ती आपल्या अंतकरणातील
    3 गोष्टी ओळखेल.
    हसण्यामगील दुःख रागवण्या मागील प्रेम
    आणि शांत रहाण्यामागील कारण"


    "जोड़ीदार सुंदर नाही,काळजी
    करणारा पाहिजे"

    मराठी सुविचार | प्रेरणादायक सूविचार | शालेय मराठी सुविचारMarathi Suvichar Sangrah


    “जीवनात कधी कुणाला कमी समजू नका ,
    कारण पूर्ण जगाला बुडवण्याची
    ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा
    एक थेंब बुडवू शकत नाही”


    "भविष्याचा अंदाज घेण्याचा
    उत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे.”


    “जीवनात नेहमी सत्यासोबत चाला
    मग वेळ आपोआपच
    तुमच्यासोबत चालायला लागेल..”



    “कम्फर्ट झोनमधून बाहेर जा, जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पहाण्यासाठी तयार असाल तेव्हाच आपण पुढे जाऊ शकता.”


    “ज्याला वेळेची किंमत कळते.
    समाजात त्याला मान मिळतो..”


    मराठी सुविचार | प्रेरणादायक सूविचार | शालेय मराठी सुविचार

    Marathi Suvichar Sangrah

    “जीवनात सर्वात मोठा आनंद 
    म्हणजे 
    आपण करू शकत नाही 
    असे लोक म्हणतात
     ते कार्य करणे होय.”





    “जुन्या पानांची पतझड 
    झाल्याशिवाय 
    नवीन पाने झाडावर येत नाहीत, 
    त्याचप्रकारे
     मानवाचे चांगले दिवस 
    त्रास आणि त्रास 
    सहन केल्याशिवाय येत नाहीत.”





    "आपलं दुःख पाहुन कोणी
    हसले तरी चालेल,
    पण आपल हसणं बघुन,
    कोणी दु:खी राहता कामा नये"





    “ध्येयाचा पाठलाग करताना
    अर्ध्या वाटेने मागे
    जाण्याचा विचार कधीही करु नका
    कारण तुम्हाला परत
    जाण्यासाठी जेव्हढे अंतर आहे,
    तेव्हढ्याच अंतरावर तुमचे उद्दिष्ट आहे.”




    "काही लोक हे
    आगीसारखे असतात…
    विनाकारण जळत राहतात"

    मराठी सुविचार | प्रेरणादायक सूविचार | शालेय मराठी सुविचार


    "आपल्या आत्मसन्मानाचे रक्षण हा
    माणसाचा प्रथम धर्म आहे- मूंशी प्रेमचंद"




    "दिवसभरात एकदा तरी स्वतःशी संवाद साधा.
    तसे न केल्यास तुम्ही जगातील
    एका चांगल्या व्यक्तीच्या भेटीची संधी गमवाल.
    -स्वामी विवेकानंद"





    "गोड बोलण्याचे सोंग करणारा माणूस
    कधीही हितचिंतक नसतो."




    “कोणाशीही खोटे बोले तर चालेल पण
    स्वतःशी कधीही खोटे बोलू नका! !!




    “जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा
    चांगल्या कर्माचे फळ आहे आणि
    जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा
    चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.”



    मराठी सुविचार | प्रेरणादायक सूविचार | शालेय मराठी सुविचार

    Positive Suvichar

    "तुम्हाला पुढे जाता येत नसेल
     तर पुढे जाऊ नका.
    पण पुढे जाणाऱ्याला मागे खेचू नका
    - लोकमान्य टिळक"


    "निंदेला घाबरुन आपलं
    ध्येय सोडू नका.
    कारण धैर्य साध्य होताच,
    निंदा करणा-यांचं मत बदलतं."


    "एखाद्याला सोडून जाताना
    मागे पहावस वाटलं तर पुढे जाऊच नये…
    जीवघेण्या माणसांच्या गर्दीत
    एकट राहण्यापेक्षा…. जीव लावणाऱ्या
    ‘माणसाच्या मनात भरून रहाव….”!!




    "दुसऱ्याबद्दल तेवढेच बोला 
    जेवढे
    स्वतःबद्दल ऐकू शकाल."




    "कुणाला आपलंस करायच असेल तर
    वरवरुन करण्या पेक्षा
    हृदयाने आपलंस करावं….
    आणि
    कुणावर रागवुन बसत राहायच असेल तर
    हृदया पासुन रागवण्या पेक्षा
    वरवरुन रागवत राहावं."



    मराठी सुविचार | प्रेरणादायक सूविचार | शालेय मराठी सुविचार



    "मी तुझी काळजी
    करतोय/करतेय दखवणारे नेहमीच
    काळजी करत नसतात कदाचित
    त्यांनी नावाला नाते
    जोडलेल असू शकतं."





    "चांगले कुटुंब आणि जीवाला
    जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे
    दुसर काही नसून जिवंतपणीच
    मिळालेला.. स्वर्ग आहे…"




    "जीवनात चांगला माणूस होण्यासाठी
    एवढचं करा.
    चुकाल तेव्हा माफी मागा ; 
    अनं
    कुणी चुकलं तर माफ करा "!





    "गोड बोलण्याचे सोंग करणारा माणूस
    कधीही हितचिंतक नसतो."





    “रागात कधीच चुकीचे बोलू नका,
    मूड चांगला होतो
    पण बोललेले शब्द परत येत नाहीत!.”


    “रागात कधीच चुकीचे बोलू नका, मूड चांगला होतो पण बोललेले शब्द परत येत नाहीत!.”

    Positive Suvichar


    "कष्ट ही एक अशी चावी आहे
    जे नशीबात नसलेल्या गोष्टींचे
    सुध्दा दरवाजे उघडते."





    "एखादी उत्तम लहानशी गोष्ट 
    आपण दररोज करत राहिलो
    तर त्या गोष्टीचे 
    कालांतराने मिळणारे फळ हे महाकाय असते."





    “आपल्या प्रतिमेची काळजी घ्या
    कारण
     ते तुमच्या वयापेक्षा जास्त
    वय तुमच्या प्रतिमेचे आहे.”






    “स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय
    आपल्या उपस्थितिची दखल घेतली
    जात नाही...........





    "तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
    तितकंच सुखी तुम्ही रहाल.
    आपल्या विषयी वाईट बोलणारे
    बरेच लोक असतात,
     त्यांच्याकडे
    लक्ष द्याल तर विखुरले जाल
    मनं शांत ठेवुन पुढे जाल तर
    नेहमी यशस्वी व्हाल…!"



    मराठी सुविचार | प्रेरणादायक सूविचार | शालेय मराठी सुविचार


    "लोग अक्सर कहते हैं।
    ‘जिन्दा रहे तो फिर मिलेंगे”
    मगर एक सच्चे दोस्त ने क्या खूब
    कहा हैं की
    मिलते रहोगे तो जिन्दा रहेंगे"




    "मी झुकतो कारण मला नाती
    निभवायला आवडतात…
    नायतर चुकीचा मी
    कालही नव्हतो आणि आजही नाहीये"




    “टीकाकारांनचा नेहमी आदर करा ,
    कारण
    ते तुमच्या गैर हजेरीत
    तुमचे नाव चर्चेत ठेवतात”




    "शहाणपण कोणालाही
     शिकवता येत नाही
    ते
     उपजतच असावं लागत."





    "तीन गोष्टी जास्त वेळ 
    लपून राहत नाहीत,
    सूर्य, चंद्र आणि सत्य"
    - गौतम बुद्ध



    मराठी सुविचार | प्रेरणादायक सूविचार | शालेय मराठी सुविचार


    “मूर्खांकडून प्रशंसा 
    ऐकण्यापेक्षा चांगले!
    हुशार माणसाची 
    ओरड ऐकावी"... 



    "गरुडाइतके उंच उडता येत नाही 
          म्हणून
    चिमणी कधीही उडणे सोडत नाही".




    "आदर ही एक अशी गोष्ट आहे
    की 
    जो दुसऱ्याला दिला तरच
    आपल्याला मिळतो."




    "जीवनात आव्हाने टाळण्याचा
    कोणताही पर्याय नाही,
    म्हणून एकतर त्यांचा सामना करण्यास
    शिका किंवा हार मानू नका."




    “आपल्या समस्यांवर उपाय
    फक्त आपल्याकडे आहे.
    इतरांकडे समस्येसाठी
     फक्त सूचना आहेत!.


    मराठी सुविचार | प्रेरणादायक सूविचार | शालेय मराठी सुविचार



    "आयुष्यात कुठल्याही परीस्थितीत
    सुखी राहण्याचा प्रयत्न करा,
    दुःखी राहिल्याने
    उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाहीयेत उलट
    आजचे सुख सुद्धा निघून जाईल".





    "जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न
    करतात
    त्यांचे निकाल लावण्याचे
    सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा".





    "काही चुकत असेल तर,
    त्याच्यापासून पळून जाण्याऐवजी,
    ते दुरुस्त करा तरच
    तुम्ही पुढे जाऊ शकाल"...




    "गरीबी आणि श्रीमंती यावर
    अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे…
    तर यावर अवलंबून असते की
    तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही
    किती समाधानी आहात"…


    ज्ञाना नंतर जर अहंकार जन्म घेत 
    असेल
     तर ते ज्ञान विष आहे.
    परंतु ज्ञाना नंतर जर नम्रता जन्म घेत 
    असेल 
    तर ते ज्ञान अमृत आहे.


    मराठी सुविचार | प्रेरणादायक सूविचार | शालेय मराठी सुविचार




    “आपल्याला कोणी फसवले
    ह्याचे दुःख फार काळ
    राहत नाही
    पण आपण कोणाला फसवलं नाही याचा
    आंनद मात्र लांब काळापर्यंत राहतो.”




    "प्रगती करणारा दुसऱ्याच्या वाटेत,
     अडथळा निर्माण करत नाही,
    आणि 
    दुसऱ्याच्या वाटेत अडथळा
     निर्माण करणारा प्रगती करत नाही".




    "अहंकारासारखा दूसरा
    भिकारी होणं नाही आणि
    विनम्रते सारखा अन्य सम्राट नाही".




    “जर आपल्याला हिऱ्याची
    चाचणी घ्यायची
    असेल तर अंधार होण्याची वाट पहा
    उन्हात काचेचे तुकडेसुद्धा
    चमकू लागतात.”




    "माणसानं मनात काही ठेवू नये,
    नाहीतर डोक्यावर परिणाम होतो.


    मराठी सुविचार | प्रेरणादायक सूविचार | शालेय मराठी सुविचार




    "ज्यांच्या जवळ सुंदर सुंदर विचार
    असतात,
    ते कधीही एकटे नसतात"..




    "सदगुणांसाठी दुसऱ्याकडे बघा
     व
    दुर्गुणांसाठी स्वतःवर नजर ठेवा ".




    "आज घड्याळाच्या गजराचा
    त्रास होईल पण 
    त्यामुळेच
    टाळ्यांचा कडकडाट ऐकू शकाल…"




    "जगात खुप चांगली माणस आहेत…
    जर तुम्हाला ती माणस भेटत
    नसतील तर तुम्ही चांगले व्हा…
    कदाचीत तूमच्या शोधात कोणीतरी असेल…"




    "उपवास
    हा नेहमी अन्नाचाच
    का करावा….? 
    कधी कधी
    वाईट विचारांचा ही
    करावा…"


    मराठी सुविचार | प्रेरणादायक सूविचार | शालेय मराठी सुविचार




    “गरुडासारखे उंच उडायचे असेल तर
    कावळ्यांची संगत सोडावी लागते.”




    "फोटो एडिट करून
     चेहऱ्यावरचे डागजातील 
    पण
     मन स्वच्छ करायला
    चांगले विचार लागतात".




    "मन मोकळे असणे
    कधीही चांगले. 
    परंतू जीभ
    कधी मोकळी सोडू नका".




    "कर्म एक असं रेस्टॉरेंट आहे
    जिथं ऑर्डर द्यायची
    गरज नाही…
    तिथं आपल्याला तेच मिळतं
    जे आपण
    शिजवलेलं असतं"



    प्रेरणादायक सूविचार | Marathi Motivational Quotes|पॉझिटिव्ह सुविचार


    मराठी सुविचार | प्रेरणादायक सूविचार | शालेय मराठी सुविचार


    कधी कधी माणूस हा आपल्याच विचारांनी थकून जातो, समोर काय करावं हे त्याला सुचत नाही,मग अशा वेळी आपल्यला चांगले विचार त्यातून बाहेर काढतात,तर आज आप
     प्रेरणा दायी सुविचार,मराठी motivational Quotes 
    पाहणार आहोत.

    “क्षमतेपेक्षा जास्त धावल की
    दम लागतो
    आणि
    क्षमतेपेक्षा जास्त
    धावायला पण दमच लागतो.”




    “तुम्ही कितीही प्रतिभावान
    असलात तरी,
    प्रयत्न आणि अभ्यासाशिवाय
    सर्व काही व्यर्थ आहे!.”




    “ज्यांच्याकडे एकट्याने
    चालण्याचे धैर्य आहे त्यांच्या
    मागे एक दिवस काफिला असतो.”




    “दगडात एक कमतरता आहे
    की तो कधी वितळत नाही
    पण एक चांगलेपणा आहे
    की तो कधी बदलत नाही.”






    “नशिबापेक्षा कर्तृत्वावर
    जास्त विश्वास असावा
    कारण उद्या येणारी वेळ
    आपल्या नशीबामुळे नाही तर
    कर्तृत्वामुळे येते.”


    मराठी सुविचार | प्रेरणादायक सूविचार | शालेय मराठी सुविचार

    सुविचार मराठी


    "जर पाहिलेली स्वप्न पूर्ण होत
    नसतील तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा
    तुमच्या कामाची पद्धत बदला,
    कारण झाडे नेहमी आपली पान
    बदलतात मूळ नाही…"





    “नेहमीच लहान बनून राहा
    प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो,
    आणि इतके मोठे व्हा की
    जेव्हा आपण उठाल
    तेव्हा कोणीही बसललेे नसेल.”




    “नात्याचा कधीही
    गैरवापर करू नका
    चांगली माणसं आयुष्यात
    पुन्हा पुन्हा येत नाहीत..”




    "चेहरा सुंदर असला म्हणजे माणूस चांगलाच
    असेल असं होत नाही,
     त्यासाठी 
    मन
    सुंदर असावं लागतं"




    "हल्ली फक्त
    स्वतःला शोधायला वेळ लागतो 
    बाकी सगळ
    Google वर सहज सापडत."


    मराठी सुविचार | प्रेरणादायक सूविचार | शालेय मराठी सुविचार

    suvichar in marathi


    "हरलात तरी चालेल…
    फक्त जिंकनारा स्वतःहून
    म्हटला पाहिजे, हा खेळ आयुष्यातील
    सर्वात कठीण खेळ होता…"




    "आयुष्य असं जगा कि
    स्वतःच स्वतःला आवडलं पाहिजे,
    दुनियेच्या आवडीचा विचार कराल तर,
    त्यांची आवड तर
    क्षणाक्षणाला बदलत राहते…"





    “स्वतःची वाट स्वताच बनवा
    कारण इथे लोक वाट
    दाखवायला नाही
    वाट लावायला बसलेत.”





    “सांभाळून चला कारण
    कौतुकाच्या पुलाखाली
    मतलबाची नदी वाहत असते.”




    "आयुष्यातले काही अपघात
    हे चांगले असतात
    सगळं विसरून नव्याने अस्तित्व
    निर्माण करण्यासाठी ".



    मराठी सुविचार | प्रेरणादायक सूविचार | शालेय मराठी सुविचार






    “फसवणूक केली तर आज नाही तर उद्या
    तुमची फसवणूक होईल,
    जर तुम्ही आयुष्य सत्याने जगलात तर
    त्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षणी शांती मिळेल!.”





    “ध्येय सापडले नाही
    तर मार्ग बदला!
    कारण झाडे मुळे नव्हे
    तर पाने बदलतात !! “





    "आपण काही करण्यास
    घाबरत असाल तर
    ते लक्षात ठेवून आपले कार्य
    खरोखर धैर्याने भरलेले आहे.”



    "मान्य आहे की वाईट
    वेळ सांगून येत नाही,
    पण जेव्हा कधी येतो
    काहीतरी शिकवून तो नक्कीच जातो ”





    “जो मैदानात हरतो
    तो पुन्हा जिंकू शकतो,
    परंतु मनातुन हरणारा
    माणूस कधीही जिंकू शकत नाही ”




    शालेय मराठी सुविचार |Educational Quotes

    मराठी सुविचार | प्रेरणादायक सूविचार | शालेय मराठी सुविचार


    अस म्हणतात कि केवळ शिकून उपयोग नसतो तर त्या ज्ञानाचा योग्य वापर करता यायला हवा. तर आज अशेच उपयुक्त असे शालेय सुविचार बघणार आहोत....



    "वेळ पण शिकवते
    गुरु पण शिकवतात,
    दोघात फरक फक्त
    इतकाच आहे कि गुरु शिकवून
    परीक्षा घेतात आणि वेळ मात्र परीक्षा
    घेऊन शिकवते.."






    "स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो,
    सद्गुणांचा सुगंध मैलावरुन ही येतो"






    "आयुष्यात अपयश नावाची
    कन्सेप्टच अस्तित्वात नसते.
    एक तरी तुम्ही यशस्वी होता
    किंवा तुम्ही शिकता."







    “माणसाला आपल्या ध्येयात
    यशस्वी होण्यासाठी
    स्वतःवर विश्वास ठेवणे
    खूप महत्वाचे आहे...."






    "मुलींना चार पुस्तक
    जास्त शिकूद्या आईच्या
    गर्भातून वाचल्यात, हुंड्यापासून
    पण वाचूदयात…"


    मराठी सुविचार | प्रेरणादायक सूविचार | शालेय मराठी सुविचार

    मराठी सुविचार 


    "संयम हा यश मिळवण्यासाठी लागणारा सर्वात
    महत्त्वाचा घटक आहे
    - डॉ. एपीजे अब्दुल कलाम ".





    "कोणतही कार्य
    करण्यापूर्वी क्षणभर थाबा.
    त्याच्या परिप्णामाबद्दल विचार करा.
    त्या नंतर सुरुवात करा."






    “जगात प्रत्येकाकडे 24 तास असतात,
    ज्यांना यशस्वी व्हायचे असेल
    ते त्याचा योग्य प्रकारे
    वापर करण्यास शिकतात.”






    “संघर्ष केल्याशिवाय
    कोणीही महान होत नाही
    जोपर्यंत छणीचा घाव घेत नाही
    दगडसुद्धा देव होत नाही.”






    "कष्ट हा उंबरठ्यावरचा दिवा आहे,
    तो वर्तमान आणि
     भविष्य दोन्हीकडे उजळ पाडतो ".



    मराठी सुविचार | प्रेरणादायक सूविचार | शालेय मराठी सुविचार



    "ज्ञान म्हणजे शिकण,
    शहाणपण म्हणजे काही ना काही सोडून देणं ".
      




    "परिस्थिति गरीब असली तरी चालेल,
    पण विचार ‘भिकारी’ नसावेत…"





    "शिक्षणावर केलेली गुंतवणूक,
     उत्तम व्याज मिळवून देते ".





    "शिक्षण हे सर्वात प्रभावी हत्यार आहे,
    ज्याचा उपयोग तुम्ही,
     जग बदलण्यासाठी करू शकतात ".






    "जो शाळेचे दरवाजे उघडतो,
     तो जेलचे दरवाजे बंद करतो."






    "प्रत्येक चांगल्या विचारांची प्रथम चेष्टा होते,
    मग त्याला विरोध होतो,
    शेवटी त्याच विचारांचा स्वीकार केला जातो."



    मराठी सुविचार | प्रेरणादायक सूविचार | शालेय मराठी सुविचार


    "आपणा सर्वांकडे समान कौशल्य नाही,
    पण ते कौशल्य विकसित करण्याची 
    समान संधी मात्र आहे"
    - रतन टाटा.





    "समजाच्या हितासाठी ज्या ज्ञानाचा
    उपयोग होत नाही 
    ते ज्ञान काहीही कामाचे नाही."





    “आयुष्यात आपण किती
    वेळा हरला आहे
    काही फरक पडत नाही
    कारण तुमचा जन्म
    जिंकण्यासाठी झाला आहे !!





    "शाळेत मैत्री करा पण
     मैत्रीत शाळा करू नका."





    “आयुष्यात काही मिळवायचे असेल
     तर मेहनतीशी मैत्री करा.... “






    "प्रयत्न करून चुकलात तरी चालेल पण
    प्रयत्न करण्यास चुकू नये… 
    हिंमत नाही…तर प्रतिष्ठा नाही
    विरोधक नाही… तर प्रगती नाही".





    “कोणाच्या पायापडून
    यशस्वी होण्यापेक्षा
    आपल्या स्वतःच्या पायावर
    यशस्वी होण्यासाठी
    मनातून ठरवणे चांगले.”



    मराठी सुविचार | प्रेरणादायक सूविचार | शालेय मराठी सुविचार



    “आपले ध्येय योग्य असल्यास अपयश,
    तुम्हाला थांबवण्याऐवजी
    पुढे जाण्यासाठी हिंमत देईल.”







    "हातांच्या रेषांवर नशीब शोधन्यापेक्षा
    हातांचा योग्य तो वापर करून
    नशीब घडवायला शिका."





    “एकदा पडल्यावर हार मानली तर
    तुमच्या आयुष्यात कधीही
    यश मिळू शकत नाही!. “





    "तुम्ही कोण आहात
    यापेक्षा 
    तुमचं ध्येय काय आहे
    महत्वाचं आहे."




    “वेळेचा सदुपयोग करायला शिका
    कारण जगातील बहुतेक
    यशस्वी लोकांनी त्याचा वापर केला आहे..”





    “कुणालाही चांगलं किंवा वाईट
    म्हणण्याआधी विचार करा की
    जर कुणी तुम्हाला तेच शब्द बोलले तर
    तुम्हाला कसं वाटेल..”


    मला अशा आहे कि तुम्हाला हे मराठी सुविचार , प्रेरणादायक सूविचार, शालेय मराठी सुविचार
     नक्की आवडले असतील,जर आवडले असतील तर आपल्या मित्रां सोबत नक्की share करा, व अशाच मराठी Status साठी इतर Article वाचायला विसरू नका.

    टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या
    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.