नमस्कार आज आपले "मराठी जगत" या ब्लॉगवर स्वागत आहे. आज आपण येथे मराठी बालकविता म्हणजेच Nursery Rhymes बघणार आहोत. आजकालच्या धावपळीच्या युगात आपल्या लहान मुलांना आपण कशात गुंतवून ठेवावे हा सर्वात मोठा प्रश्न पालकांसमोर उभा आहे. बालकविता म्हणजेच Nursery Rhymes, Balgeete याद्वारे मुलांना आपण अनेक चांगल्या गोष्टी शिकवू शकतो. लहान मुले कवितेमध्ये खूप रममान होतात. एक वेगळाच आनंद आपणास त्यांच्या चेहऱ्यावर बघण्यास मिळतो. इंग्रजीमध्ये कितीही नवीन Songs आले तरी आपली मायबोली मराठी काही वेगळीच भासते, तर आज आपण येथे मराठी बालगीत बघणार आहोत.
बालगीतांची सुरुवात करण्यापूर्वी आपण आपल्या मुलांना एक सुंदर अशी प्रार्थना शिकवू शकतो. ती म्हणजेच "शुभंकरोती" ही प्रार्थना आपल्या मुलांना शिकवून, ती रोज संध्याकाळी दिवे लागणीला त्यांच्या मुखातून वदवून घ्यावी, जेणेकरून एक सुंदर असा संस्कार आपण देऊ शकू.
1)शुभम करोति
शुभम करोति कल्याणम,
आरोग्यम् धनसंपदा,
शत्रु बुद्धी विनाशाय,
दीपक ज्योती नमोस्तुते |
2) तबडक तबडक घोडोबा
तबडक तबडक घोडोबा,
घोड्यावर बसले लाडोबा,
लाडोबाचा लाड करते कोण ?
आजी आजोबा मावश्या दोन.
3)आजी
आजी ग आजी
कर न ग भाजी,
भाजी केली कारल्याची,
कारलं झालं कडू,
बाळाला आलं रडू.
4)ढगा ढगा रुसू नको
ढगा ढगा रुसू नको,
वाऱ्यासंगे भांडू नको,
वारा तुला झुलवीत,
दूर पळून जाईल,
तिकडून विज येईल,
दोन रट्टे देईल,
रट्टे बसतील सब सब,
पाऊस पडेल टप टप.
5) मनी
मनीच्या कुशीत झोपले कोण?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन,
मीची मीची डोळे,
टिल्ले किल्ले कान,
मनीची पिल्ले गोरी गोरी पान.







