मराठी चारोळी संग्रह | Top Marathi Charoli

मराठी चारोळी हि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. चारोळी च्या साहाय्याने आपण आपल्या मनातील भावना व्यक्त करू शकता. प्रेमी जास्त करून आपल्या चारोळीच्या माध्यमातून  भावना  व्यक्त करतात. यामध्ये संपूर्ण चारोळी संग्रह मी तुमच्या समोर सादर करत आहे. ती आवर्जून पहा. 

मराठी चारोळी संग्रह | Marathi Charoli |



जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील,
एकत्र नसलं तरी सुगंध दरवळत राहील,
 कितीही दूर असलो तरी,
 मैत्रीचे नाते आज आहे तसेच उद्याही राहील.

मराठी चारोळी संग्रह | Marathi Charoli |




जगावे असे की मरणे अवघड व्हावे,
 असावे असे की रडणे अवघड व्हावे.




शब्द मोठ्यासारखे असतात म्हणून,
 कसे लिहायचे नसतात,
 शब्दांच्या ओळी होताना,
 शब्दांचे अर्थ सोडायचे नसतात.


मराठी चारोळी संग्रह | Marathi Charoli |



जिंकता येते सहज जगाला,
आधी मन जिंकता आले पाहिजे,
 मार्ग नक्कीच काढता येतो,
 आपल्याला पुढे जाता आले पाहिजे.


महाराष्ट्रातील घराघरात फक्त भगव्याची झळाळी,
शिवप्रभूंचा वास रुदय आणि भगवा टिळा भाळी,
 छत्रपतींची शपथ तुला मराठा फो डरकाळी,
ते रक्त सांडले, प्राण वेचले,
 नसते उगाच बाता,
 जगणे त्यांचे जगणे होते,
 त्या वेगळ्याच वाटा.
य भवनी जय शिवाजी.


मराठी चारोळी संग्रह | Marathi Charoli |


मैत्री म्हणजे मायेचीच आठवण,
 मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण,
 हा धागा नीट जपायचा असतो,
 तो कधी विसरायचा नसतो,
 कारण ही नाती तुटत नाहीत,
 ती आपोआप मिटून जातात,
 जशी बोटावर रंग ठेवून,
 फुलपाखरे हातची सुटून जातात.




सूर्य तोच किरण नवे,
 ऋतू तोच गीत नवे,
 शब्द तेच अर्थ नवे,
 आयुष्य तेच वर्ष नवे,
 जीवन तेच यशाचे पर्व नवे.


उसळत्या रक्तात,
 ह्या ज्वालामुखी दाह दे,
 वादळाची दे गती,
 पण ध्येयाचे भान असू दे.


मराठी चारोळी संग्रह | Marathi Charoli |



चेहरा होता हसरा,,
कधी न दिले कुना दुःख,
 मणी होते मोठेपण,
 कधी न दाखविले मोठेपण,
 उडून गेला प्राण अचानक,
 अशा सुखाच्या क्षणोक्षणी,
 आठवणी येते मनि ,
 म्हनुन कंठ येतो दाटूनी.




संस्कार केले तर संस्कृती टिकेल
 संस्कृती टिकली तर धर्म टिकेल,
धर्म टिकला तर देश टिकेल.



वाटलं होतं मला
असं काहीतरी घडेल
कविता माझ्या वाचून
कोणीतरी प्रेमात पडेल





तुला पाहिलं की
अस काय होवून जात,
माझ मन मला
कस विसरून जात.


मराठी चारोळी संग्रह | Marathi Charoli |






ह्रदयावर डोकं ठेव ,
बघ काय ऐकू येतं का…
ह्रदयाच्या प्रत्येक ठोक्यात,
नाव तुझंच येतं का ?




डोळे तुझे कातील ,
ह्रदयावर वार करतात….
ह्रदयातील प्रेमाची अलगद ,
तार छेडतात….





मिठीत जेव्हा तुला हळूच माझ्या घेतले…
खरं सांग तू तेव्हा कितीसे तुझ्यात उरले…





जीवनात सगळंच मिळत नाही
म्हणून प्रयत्न सोडायचा नसतो
कुठल्यातरी वळणावर
आपला वाट पाहणाराही असतो.




मी सांगत नाही तुला ,
भरभरुन प्रेम दे…
पण जेवढं देशील ,
ते ह्रदयातून येऊ दे…


मराठी चारोळी संग्रह | Marathi Charoli |



जीवन कसे पक्ष्यांसारखे असावे,
कुठे ही उडावे आणि कसे ही जगावे
आणि मरताना देखील कधी कुणावर
आपले ओझे न देता जावे.




न संपणारे स्वप्न असावे,
 न बोलता ऐकू येणारे शब्द असावे,
 ग्रीष्मात पाऊस पडते असे ढग असावे,
न मगता सोबत भेटेल असे मित्र असावे.




जो विचारांना कृतीत आणतो,
तो फक्त प्रकाशात आणतो,
आपण फक्त विचार करतो उडण्याचा,
तो आधीच ते विचाराने पक्का असतो.




जो करेल शेतीचा धंदा,
तोच खरा कल्या मातीचा,
हेच खऱ्या मर्दाचे काम,
जो करेल कष्टाचे काम.




संपत नसतात वाटा,
कारण त्या असतात बेधुंद,
टाळ्या वाजवून करा चिमुकलांचा द्विगुणित आनंद.

मराठी चारोळी संग्रह | Marathi Charoli |


जीवनाची काय हमी आहे,
एक श्वास नामी आहे,
भेटलो आपण काहीच,
क्षणासाठी हेच काय कमी आहे.




देता येत नसेल काही,
प्रेम मात्र सर्वांना द्यावे,
दोन हातांच्या टाळ्यांनी,
चिमुकल्यांना प्रोत्साहन द्यावे.




कर्तुत्व असे असावे की,
हिमालयाने ही खाली झुकावे,
स्पर्श होता हाताचा मातीचेही सोने व्हावे.





जरी तुमचा माझा वेगळा,
धर्म आणि जातं,
चला भेटूया आता समता बंधुत्वाची लाट.

मराठी चारोळी संग्रह | Marathi Charoli |





प्रेमाची हाक द्या,
अशीच थोडी साथ द्या,
चुकलं तर क्षमा करा, 
नाहीतर मनापासून दाद द्या.



छापा असो वा काटा असो,
नाणे खरे असावे लागते.
मैञि असो वा नसो,
भावना शुध्द असाव्या लागता.





जीवनाचा प्रत्येक क्षण,
आपल्याला काहीतरी देत असतो,
पण नकळतपणे आपल्या,
आयुष्याचा एक क्षण तो घेत असतो.




जीवनाच्या मैफिलीत आज सारी गणिते उजवी ठरली
बेरीज आणि वजाबाकी आज श्वासांमध्ये अडकून पडली.






जीवनात नाती तशी अनेकच असतात,
पण ती जपणारी लोक फार कमीच असतात.





मोत्यांना काय माहित,
शिंपल्यानी त्यांना किती जपलयं,
मोत्यांच्या केवळ नाजुकपणासाठी
त्यांनी आपलं आयुष्य वेचलयं.


मराठी चारोळी संग्रह | Marathi Charoli |




भावना ओंजलित घेउन नको जगुस,
त्या व्यक्त करन्यात मजा आहे.
डोळ्यात अश्रु नेहमीच येतात,
ते पुसुन हसन्यात मजा आहे.



बोलायचे बरेच काही
पण, कोणी ऐकायला तयार नाही.
आपले म्हणणारे तसे हजार,
तरी शब्दांचाही आधार नाही.





मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं,
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.



हे प्रेमाचं असचं असत.
थोडसं अवघड अन थोडं सोप असत.
पण एकदा जमायला लागलं की ते आपोआपच घडत असतं.





माझं तुझ्याकडे एकटक पाहणं,
अन्‌ तुझं ते गोड हसणं,
आपल्या दोघांनाही सुखावत होतं,
पण दृष्ट जगाला ते पाहावत नव्हतं.





तू मला खूप आवडतेस,
बोलण्याकरिता जीभ ही वळत नाही.
जेव्हा असतं बोलायचं,
तेव्हा ओठांना शब्दचं मिळत नाही.


मराठी चारोळी संग्रह | Marathi Charoli |




सावली नको शोधु ती आपल्या जवळच असते,
नजर फक्त मागे वळव डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते.





मऊपण काय असत,
हे तिच्या एका स्पर्शाने सांगितलं
त्या एका स्पर्शातच मी तीच प्रेम मागितलं.






प्रेम माझं असलं
तरी मी मात्र तुझाच आहे.
शब्द माझे असेल
तरी सामर्थ्य त्यात तुझंच आहे.




पाहता पाहता मन माझ तुझ्यात विसावून गेल,
तुझ्या रूपाला पाहूनं ते स्वप्नात हरवून गेल.




ह्या पडणाऱ्या पावसात
तुझ्या सोबत भिजु वाटतं..
पण तु आजारी पडशील म्हणूनच
तुझ्या सोबत भिजायला मन माझं घाबरतय.




हे आपला अबोल प्रेम
असाच सुंदर असु दे
पण स्वप्नात का होईना
एकदा तरी खुलू दे.

मराठी चारोळी संग्रह |  Top Marathi Charoli




ह्रदयात एक जखम
आजही सळत होती…
आठवण तुझी, का?
मलाच छळत होती.





होती लाही लाही झालेली तिची काया
आता रूप अन रंग हि उजळलेला
अशी पांघरली धरतीने हिरवाई
जणू हिरवा शालू नववधुने ल्यालेला.




हे प्रेमाचं असचं असत..
थोडसं अवघड अन थोडं सोप असत..
पण एकदा जमायला लागलं की
ते आपोआपच घडत असतं.




हृदयात नेहमीच तुझ्यासाठी
थोडी जागा जपून ठेवतो…
कधीतरी येशील म्हणून त्या
जागेवर फुले पांघरूण ठेवतो…






हृदय काहितरी सांगतय तुला,
वाट पाहते आहेस तु कोणाची तरी……
का लपवतेस भावना तुझ्या मनात,
हो कोणाच्यातरी मनाची रानी…




हिवाळ्यातील ही गुलाबी हवा
सोबत तू ही असावी..
घट्ट मारलेल्या मिठीत
शिरण्यास थंडीसही जागा नसावी..




हात हजार मिळतात
अश्रू पुसण्यासाठी,
डोळे दोनही मिळत नाहीत
सोबत रडण्यासाठी.





हळुवार जपून ठेवलेले क्षण,
तेच माझ्या जगण्याची आस आहे…
एकेक साठवून ठेवलेली आठवण,
तिच माझ्यासाठी खास आहे…




हसतेस इतकी सुंदर की,
तुझ्याकडे बघत बसतो…
आठवणीत मग तुझे ते
गोड हसणेच पाहत असतो…


मराठी चारोळी संग्रह |  Top Marathi Charoli





सहवासाच्या वेलीवर प्रीतीचे फुल
केव्हा उमलल कळलच नाही,
तु माझी, तु माझी म्हणताना,
मी तुझा केव्हा झालो कळलचं नाही.




हल्ली मला भावनांचा
थांगच लागत नाही ,
क्षणभरही मनाला आता
उसंत मिळत नाही.

अशा करते कि तुम्हाला ह्या मराठी चारोळ्या नक्की आवडल्या असतील, तरी बाकीचे माझे Article वाचायला विसरू नका. अशाच नवनवीन गोष्टी साठी Article वाचत राहा. 
मराठी जगत वर. 
धन्यवाद ।   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.