नवीन मराठी छान छान गोष्टी | Bodh katha Marathi

 सर्व मुलांना छान छान गोष्टी खूप आवडतात. तुमची आवड समजूनच मी येथे छान छान गोष्टी दिलेल्या आहेत,Bodh kathe च्या माध्यमातून आपण मुलांना चांगल्या सवयी समजून सांगू शकतो. असं म्हणतात की ज्या गोष्टी मारून समजत नाहीत त्या गोष्टी आपण stories च्या माध्यमाने मुलांना योग्यरीता समजून सांगू शकतो. मराठी कथेवरून योग्य असा बोध घेऊन आपण मूल्यांची जोपासना करू शकतो. बालवयामध्ये योग्य असे संस्कार त्यांच्यावर करू शकतो. आधी एकत्र फॅमिली असल्यामुळे आजी छान छान गोष्टी मुलांना सांगायची पण आज त्याच गोष्टी आपणास you tube,mobile किंवा इंटरनेटवर सर्च कराव्या लागतात. तर येथे खूप छान छान Moral Stories आहेत ज्या तुम्ही मुलांना सांगू शकता किंवा दाखवू पण शकता.


मराठी कथा | Marathi Katha | Stories for kids in Marathi



    1)
    चल रे भोपळ्या टुणुक टुणुक | Chal Re Bhoplya Tunuk Tunuk |
    मराठी कथा


    मराठी कथा | Marathi Katha | Stories for kids in Marathi


               
    एक होती म्हातारी.तिला एक मुलगी होती. एकदा तिला असं वाटलं की आपल्या मुलीकडे जावं आणि मुलीला भेटावं म्हणून ती मुलीकडे जाण्यासाठी निघाली, वाटेत एक जंगल होतं. तेव्हा तिला एक कोल्हा भेटला तो म्हणाला; म्हातारे, म्हातारे मी तुला आता खातो? म्हातारी म्हणाली मी एवढी बारीक, मला खाऊन तुझे पोट कसे भरणार? मी एक काम करते, माझ्या मुलीकडे जाते,  तूप रोटी खाते, जाडजूड होते मग मला तू खा, कोल्हाला पण तिचे म्हणणे पटले आणि त्याने म्हातारीला जाऊ दिले.
             समोर जाऊन तिला एक वाघ दिसला.त्याने म्हातारीला बघून डरकाळी फोडली आणि म्हणाला; म्हातारे, म्हातारे मी तुला खातो, म्हातारी पुन्हा तेच म्हणाली,मला खाऊन तुझे काही पोट भरणार नाही? मी मुलीकडे जाते, तूप रोटी खाते, जाडजूड होते मग मला तू खा, वाघाला तिचे म्हणणे पटले व त्याने म्हातारीला जाऊ दिले. म्हातारी इकडे मुलीकडे आली खूप छान असा पाहूनचार घेतला; खूप दिवस राहिली व तिच्या मनाने आता परत जायचा विचार घेतला आणि तिला आठवले की आता आपल्याला वाटेमध्ये कोल्हा आणि वाघ दिसणार आहेत. म्हणून तिने मुलीला शेवटचं बघून घे आणि मग मी येते असं म्हणाले. जेव्हा मुलीने काय झाले विचारले तेव्हा म्हातारीने कोल्हा आणि वाघा बद्दल तिला सांगितले. तेव्हा मुलीने म्हातारीला एक जादूचा भोपळा दिला.               
          म्हातारी भोपळ्यात बसली आणि म्हणाली चल रे भोपळ्या टुणुक टुणुक. समोर जाऊन म्हातारीला कोल्हा दिसला. त्यांनी विचारले काय रे भोपळ्या तुला म्हातारी दिसली का. म्हातारी भोपळ्यातून म्हणाली; कोण म्हातारी? मला काही माहिती नाही. आणि म्हातारी म्हणाली चल रे भोपळ्या टुणुक टुणुक. समोर जाऊन पुन्हा म्हातारीला वाघ दिसला; वाघ म्हणाला काय रे भोपळ्या तुला म्हातारी दिसली का? म्हातारी भोपळ्यातून म्हणाली; कोण म्हातारी? मला काही माहिती नाही. आणि म्हातारी म्हणाली चल रे भोपळ्या टुणुक टुणुक. 

              अशाप्रकारे म्हातारीने आपली सुटका करून घेतली आणि आपल्या घरी सुखाने राहू लागली.


    तात्पर्य: शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.

    2)लांडगा आला रे आला | Landga Aala Re Aala | मराठी कथा


    2)लांडगा आला रे आला | Landga Aala Re Aala | मराठी कथा


             
    एका गावामध्ये एक धनगर आणि त्याचा मुलगा रमेश राहत होता.  उदरनिर्वाह करण्यासाठी तो धनगर त्याच्या मेंढ्या गावच्या डोंगरावर 
    रण्यासाठी न्यायचा. त्याचा मुलगा रमेश खूप निष्काळजे व गावभर उनाडक्या करणारा होता. त्याला कोणतेही काम सांगितले तर ते करण्याचा त्याला कंटाळा यायचा. यावर उपाय म्हणून त्या धनगराने त्याला रोज मेंढ्या चरणाचे काम दिले होते. फक्त वडिलांची आज्ञा म्हणून व शिक्षेपासून वाचावे म्हणून तो मेंढ्या चरायला घेऊन जायचा. असेच एक दिवस मेंढ्या चरायला घेऊन गेला व त्याला तिथे बसता बसता कंटाळा आला; त्याला असे वाटले की थोडी गंमत करावी; म्हणून तो तिथल्या झाडावर चढून जोरजोरात ओरडायला लागला "लांडगा आला रे आला" , गावकऱ्यांना जसा त्याचा आवाज आला तसे ते हातां मिळेल ते काठी,शस्त्र घेऊन धावत रमेश कडे आले. गावकऱ्यांना असं बघून रमेश जोरजोरात हसू लागला व म्हणू लागला कशी गंमत केली. ते बघून गावकरी रागाने निघून गेले. दुसऱ्या दिवशी पण रमेशने अशीच गंमत केली की "लांडगा आला रे आला" व गावकऱ्यांना फसवले,रोजच काही ना काही करून रमेश गावकऱ्यांची गंमत करत असेल व त्यांना फसवत असे.
    गावकरी आता त्याच्या गमतीला कंटाळले व त्यांनी आता रमेश ला कोणीही मदत करणार नाही असे ठरवले व त्याच्या हाकेला कोणीही धावून जाणार नाही असे म्हणून ते त्यांचे काम करायला लागले. एके दिवशी जेव्हा रमेश मेंढ्या करायला डोंगरावर घेऊन गेला तेव्हा तिथे खरंच लांडगा आला व त्याने रमेशच्या मेंढ्यांवर हल्ला केला. रमेश जोरजोराने ओरडायला लागला "लांडगा आला रे आला, वाचवा रे वाचवा ,माझ्या मेंढ्या वाचवा" गावकऱ्यांना या अशा अनेक प्रकारे विनवणी तो गावकऱ्यांची करू लागला व त्यांना आवाज देऊ लागला ;पण आजही रमेश आपली गंमतच करत असणार असे समजून गावकऱ्यांनी त्याच्या आवाजाकडे दुर्लक्ष केले व आपले काम करत बसले. शेवटी याचा परिणाम असा झाला की लांडग्याने रमेशच्या सर्व मेंढ्या फस्त केल्या व हताशपणे, रमेश ते फक्त बघत राहिला. रमेश ला आपली चूक कळली पण आता उशीर झाला होता, सर्व मेंढ्या मेल्या होत्या व रमेश फक्त रडत होता.


    तात्पर्य: थट्टा उडवणे ही वाईट असते.

    3)दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा फायदा | मराठी कथा


    दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा फायदा | मराठी कथा

    एकदा काय झाले दोन मांजरी रस्त्यामध्ये भांडत होत्या; त्यांच्याकडे एक लोण्याचा भांड होतं. त्यांचा भांडणाचा कारण असं होतं की; त्या दोघींनाही एक लोण्याचा भांड रस्त्यामध्ये मिळालं होतं व पहिली मांजर म्हणाली की; ते मला मिळालं म्हणून मीच ते खाणार व दुसरी मांजर म्हणाली; मला मिळालं म्हणून मीच ते खाणार. असं म्हणून त्या दोघी एकमेकींसोबत खूप जोरजोरात भांडत होत्या आणि म्याऊ म्याऊ म्याऊ करत होत्या. त्यांचं ते भांडण ऐकून तिथे एक माकड आलं व त्यांना बघू लागलं की यांचं नेमकं चालू काय आहे व त्याला त्या भांड्यातलं लोणी दिसल्यावर, त्याच्या तोंडाला पाणी सुटलं व तो म्हणाला काय ग मांजरी बाई, काय चालू आहे? कशासाठी भांडत आहे? काय कारण आहे भांडणाचं? मला सांगाल. मी योग्य तो न्याय तुमच्या दोघींसोबत करेल.  मांजरींना पण त्यांचं म्हणणं पटलं. त्या म्हणाला म्हणाल्या होहो माकड दादा.  आता तुम्हीच काय योग्य तो न्याय करा व आमच्या दोघींपैकी एकाला हे लोण्याचा भांड आम्हाला देऊन टाका. असं म्हणून त्यांनी ते लोण्याचा भांड माकडाकडे दिलं व माकड उगाच वेळ खात होता. तो म्हणत होता,पहिले कोण आलं? नंतर कोण आलं? दोघी पुन्हा एकमेकींसोबत भांडू लागल्या व याचाच फायदा माकडाने घेतला व लोण्याचा भांड घेऊन पळाला व संपूर्ण लोणी स्वतः खाऊन टाकलं. शेवटी काय झालं की तुझं न माझं झालं कुत्र्याचं. म्हणजे काय तर दोघींच्या भांडणांमध्ये तिसऱ्याचा लाभ झाला व संपूर्ण लोणी शेवटी माकडाला मिळालं. त्या दोघींनी जर समजूतीने घेऊन अर्ध अर्ध लोणी खाल्लं असतं आणि तिसऱ्याला त्यामध्ये घेतलं नसतं तर दोघींनाही मिळालं असतं. शेवटी दोघींनाही मिळालं नाही तिसऱ्यालाच मिळाला.

     तात्पर्य: दोघांच्या भांडणात नेहमी तिसऱ्याचा लाभ होत असतो.



    4)एकीचे बळ | Ekich Bal | मराठी कथा


    4)एकीचे बळ | Ekich Bal | मराठी कथा



             
     असं म्हणतात जे कार्य एकटा माणूस करू शकत नाही ते सगळे मिळून करून दाखवू शकतात. त्यावरच आजची आपली गोष्ट आहे. एका गावातील काही गाई शेजारच्या जंगलात चरायला जात. त्या जंगलात एक सिंह राहायचा त्याला नेहमी ठाऊक असायचं की; या जंगलामध्ये गाई चरायला येतात व तो झाडामागे दबून बसायचा; गाई आल्या की त्यांच्यावर हल्लाबोल करायचा व नेहमी गाईंची शिकार करायचा. हे असं अनेक दिवस चालू होतं व गाईंचे संख्या संपू लागली .एक दिवस हा सर्व प्रकार बघून गाईंनी सभा घेतली व त्यातली एक वृद्ध गाय असे म्हणाले की ;आपण सर्वजणी एकेकट्या फिरतो म्हणून तो सिंह आपल्यावर मात करू शकतो. आपण जर सर्वजणी एकत्र कळपाने राहायला लागलो तर तो सिंह आपल्याला घाबरून जाईल. तिचे हे मत ऐकून ते योग्य आहे असे ठरवून  त्यानंतर त्या गाई एकत्र कळपाने चरायला जाऊ लागल्या. जेव्हा जेव्हा सिंह त्यांच्या समोर यायचा तेव्हा तेव्हा त्या गाई त्या सिंहाच्या अंगावर धावून जायच्या व या एवढ्या मोठ्या गाय बघूनसिंह तिथून पळून जायचा हे सर्व बघून गाईंचे हिम्मत वाढली व त्यांना कळलं की एकीचे बळ हे खूप मोठे असते.


    तात्पर्य:  एकीचे बळ हे खूप मोठे असते

    5)चतुर ससा | Sasa Story |मराठी कथा

    चतुर ससा | Sasa Story |मराठी कथा




    एका जंगलामध्ये एक म्हातारा सिंह राहत होता. त्याचं वय झालेलं असल्यामुळे त्याला आता शिकार करणे खूप कठीण जात होतं. त्याने आपले पोट भरण्यासाठी एक युक्ती शोधून काढली. जंगलाचा राजा असल्यामुळे तो सर्व प्राण्यांना म्हणाला की रोज एका प्राण्याने माझ्याजवळ भोजन म्हणून यावे नाहीतर मी सर्वांना खाऊन टाकेल आणि हे जंगल संपून टाकेल. हे जंगल संपल्यापेक्षा आपण रोज एका एका प्राण्याने सिंहाजवळ जावे असे सर्व प्राण्यांनी ठरवले व रोज एक एक प्राणी जंगलामध्ये त्या सिंहाची शिकार म्हणून  तिथे जायला लागल|. एकदा एका दिवशी सशाची पाळी आली व आता आपण मरणार म्हणून तो खूप दुःखी झाला. सिंहाच्या गुहेकडे  जात असताना त्याला एक विहीर दिसली; विहीर खूप खोल व भीतीदायक होती. त्याच्या मनात एक कल्पना आली व त्याने ठरवले मरणे तर आहेत ;पण प्रयत्न करायला काय हरकत आहे; असे म्हणून तो सिंह कडे जायला निघाला. तर तिकडे सिंहाला खूप राग आला होता, की आज कोणीच जेवण म्हणून का बर आले नाही म्हणून तो खूप चिडला होता. तेवढ्यातच ससा हळूच आत आला व त्याला बघतात सिंहाने गर्जना केली;  एवढा उशीर का केलास?  ससा म्हणाला काय करू महाराज; वाटेत एक दुसरा सिंह माझ्या मागे लागला होता,त्याच्यापासून जीव वाचून तुमच्यापर्यंत याला उशीर झाला. शाचे उत्तर ऐकून सिंहाला फार राग आला व दुसरा कोणता सिंह आहे असं म्हणू लागला....... ससा म्हणाला महाराज चला माझ्यासोबत, मी तुम्हाला दाखवतो. असे म्हणून ससा त्या सिंहाला त्या मोठ्या विहिरीजवळ घेऊन आला व म्हणाला महाराज तो सिंह आत मध्ये राहतो सिंहाने विहिरीत डोकावले व त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसले त्याला बघून सिंहाने गर्जना केली व त्याच्या प्रतिबिंबाने सुद्धा तोंड वावले,सिंहाला राग आला व त्याने विहिरीत उडी मारली व सिंह त्या पाण्यामध्ये डुबून मरण पावला. अशा प्रकारे सशाच्या चतुराई मुळे सर्व प्राण्यांचा जीव वाचला.


    तात्पर्य:शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.

    6) आई | Aai |मराठी कथा

    आई | Aai |मराठी कथा




    एक राजा होता. तो राजा खूप प्रजादक्ष होता. आपल्या प्रजेला काय समस्या आहे हे; तो पटकन ओळखून त्याचे निराकरण करायचा. कोणाचा काही प्रश्न असल्यास तो प्रश्न त्याच्या सभेमध्ये तो सोडवायचा. असंच एकदा त्याच्या सभेमध्ये काही महिला रडत ओरडत आल्या. त्यांच्याजवळ एक छोटे बाळ होते व दोघेही एकमेकांसोबत भांडत होत्या व असं म्हणत होत्या की मी त्या बाळाची आई. त्यातली एक बाई म्हणाली;" हे राजा, मीच या बाळाची आई आहे "मला माझे बाळ देण्यात यावे. दुसरी बाई म्हणाली ; "हे राजा तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवू नका, तिने माझे बाळ चोरले आहे ते माझेच बाळ आहे". राजा विचार करायला लागला व थोड्या वेळाने असं म्हणाला की एक काम करा तुम्ही दोघी आहात आणि बाळ तर एकच आहे तर यावर एक उपाय करा ;की या बाळाचे दोन तुकडे करा प्रत्येकीला एक एक तुकडा देऊन टाका. पहिली बाई शांत राहिली पण दुसरी जोरजोरात रडायला लागली व म्हणाली : "राजा हे बाळ त्या बाईला देऊन टाका , पण त्याचे तुकडे करू नका". हे असे शब्द ऐकून राजा हसू लागला व मनाला की तूच त्या बाळाची खरी आहे आई आहे. कारण एक आई आपल्या बाळाची खूप काळजी करते त्याला काही झालाच तिचं मन रडू लागतं, तसंच तुझेही झालं, असे म्हणून राजाने ते बाळ दुसऱ्या बाईला देऊन दिले. पहिली जी चोरटी बाई होती तिला शिक्षा दिली. अशाप्रकारे राजाने योग्य न्याय केला


    तात्पर्य: आईचे प्रेम अमूल्य असते.

    7)जादूच्या बिया | Jack Bins | मराठी कथा

    जादूच्या बिया | Jack Bins | मराठी कथा





    खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका गावात सदू नावाचा मुलगा त्याच्या आई सोबत राहत होता, सदूची वडील लहानपणीच वारले त्यामुळे त्याचे आई आणि सदू दोघेच त्या घरामध्ये राहत होते. घरात कमावणारा कोणी नसल्यामुळे सदू व त्याची आई दोघेजण मेहनत करायचे व पैसे कमवायचे. जमेल तेवढे पैसे जमा करून त्यांनी एक गाय विकत घेतली. आता सदूला व त्याच्या आईला पैसे कमवायसाठी बाहेर जायची गरज उरायचे नाही. सदू त्या गाईचे दूध काढायचा व लोक त्यांच्याकडे दूध विकत घ्यायला यायचे, असे करता करता त्यांचा उदरनिर्वाह होत होता व त्या दोघांचे आयुष्य सुखात जात होते.एक दिवस काय झालं त्या गाईची तब्येत बिघडली वैद्य बोलावले, जमेल तेवढी सोय केली; पण काही केल्या त्या गाई मध्ये काही सुधारणा होत नव्हती, शेवटी सदू व आईने असा विचार केला की या गाईला विकून,जे पैसे मिळतील त्यात आपण दुसरा काही व्यवसाय करावा. असे ठरवून; दुसऱ्या दिवशी सदू आपल्या जेवणाचा डबा घेऊन गाय विकायला बाजारात निघाला, सकाळपासून संध्याकाळ झाली पण गाय कुणीच विकत घेतली नाही; कारण आजारपणामुळे ती खूप अशक्त झाली होती. शेवटी ती गाय घेऊन 
     सदू घरी परत निघाला. परत येता-येता त्याला एक साधू बुवा मिळाले. ते एका झाडाखाली बसले होते; त्यांना खूप भूक लागली होती ते  सदूला विचारत होते," तुझ्याकडे काही आहे का मला खूप भूक लागली आहे". सदु म्हणाला:" हो बाबाजी,माझ्या आईने मला सकाळी डबा दिला होता, पण मी कामांमध्ये होतो ते खायचा विसरले ते तुम्ही खाऊन घ्या", तसंही मी घरी जात आहे; मी घरी गेल्यावर जेवण करेल. साधू बाबांनी जेवण केले व त्या बदल्यात त्याला म्हणाले; की या बिया घे व तुझ्या अंगणात लाव. सदू त्या बिया घेऊन घरी आला व आईला सर्व काही सांगितले. आई आता वैतागली होती व ती म्हणाली काय? या बिया कशाला घेऊन आला? म्हणून तिने राग राग त्या बिया घेऊन अंगणात फेकून दिल्या व दोघेही रात्री न जेवता झोपून गेली. सकाळी उठून बघतो तर काय तर एक भला मोठा वेल सदूच्या अंगणामध्ये होता;जो आकाशाच्या दिशेने जात होता. सदू बाहेर आला आणि त्या वेलावर काय आहे म्हणून बघायला लागला आणि सरसर त्या वेलावर चढून आभाळाच्या दिशेने निघून गेला व एका भल्या मोठ्या किल्ल्याजवळ पोहोचला; किल्लाच्या आत मध्ये जाऊन बघितले तर त्या किल्ल्यामध्ये खूप साऱ्या सोन्याच्या नाणी होत्या; त्यांनी त्यातल्या काही नाणी आपल्या खिशात भरल्या व निघाला तेवढ्यात तिथे एक| राक्षसाला माणसाचा वास आला; पण सदू चालाकेने तेथून सटकला व त्या वेलावरून भरभर भरभर आपल्या घरी आला. त्यांनी ति नाने आईला दाखवली आईला पण खूप आनंद झाला व सदू ने ती नांनी विकून घरात जे आवश्यक सामान आहे; ते सर्व आणले.काही दिवस ते पैसे पुरले व नंतर संपले. संपल्यानंतर पुन्हा सदू त्या वेलावर भरभर चढायला लागला आणि त्या किल्ल्यामध्ये गेला. किल्ल्यामध्ये गेल्यावर त्याने तेथली एक बासुरी घेतली व निघाला. बासुरी जादूची होती, बासुरी वाजवल्यानंतर त्यातून सोन्याचे पैसे पडायचे ती बासुरी चुपचाप सदूने उचलली पण तेवढ्यात राक्षसनी त्याला बघितले व तो सदूच्या मागे धावायला लागला. नंतर काय? झाले,सदू पुढे......राक्षस मागे........ सदू पुढे....... राक्षस मागे .......सदू पुढे राक्षस मागे........... असं करत करत सदू वेलावरून भरभर भरभर खाली आला व ओरडायला लागला. आई मला कोयता दे........... आई मला कोयता दे..........  आई पण पटकन धावत येऊन.......... कोयता दिला व सदूने तो वेल कापून टाकला. राक्षस त्या वेलावरून खाली पडला व मरण पावला.

    अशाप्रकारे सदूला सोन्याची जादूची बासरी मिळाली व त्याने आपले जीवन सुधारले. आणि  सुखाने राहू लागले.


    तात्पर्य: कोणत्याही परिस्थितीत डोक्याने विचार करावा म्हणजे आपण संकटातून सहज बाहेर पडतो.


    8)टोपीवाला | Topivala | मराठी कथा


    टोपीवाला | Topivala | मराठी कथा




    एका गावात एक टोपीवाला राहत होता. तो टोप्या विकून त्याचा उदरनिर्वाह करायचा. त्या टोपीवालाचा रोजच काम असं होतं की रोज तू उठून आजूबाजूच्या गावांमध्ये जायचं आणि टोप्या विकायचा. तर टोपीवाला एकदा अशाच टोप्या विकण्यासाठी शेजारील गावात जायला निघाला. निघताना त्याला उशीर झाल्यामुळे खूप ऊन झालं होतं रस्ता चालताना त्याला उन्हाचे चटके लागत होते. उन्हामध्ये चारून चालून तो दमला आणि एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबला आपल्या जवळचे पाणी पिऊन जेवण करून त्याला त्या झाडाखाली छान झोप लागली झोपताना त्याने आपल 
     टोप्या गाठोडे आपल्या बाजूला ठेवलं होत. त्या झाडावर काही माकडे होती. त्या माकडाने टोपीवाल्याला बघितलं व त्याचे गाठोडे घेतले, एका माकडाने ते गाठोळे उघडल्यावर त्यामध्ये टोप्या होत्या आता शेवटी ते माकडच काय करायचं असं म्हणत त्यांनी त्याचे डोकं खाजवलं व टोपीवाल्याकडे बघितलं तर तशीच एक टोपी त्याच्या डोक्यावर होती. असं म्हणतात की माकड आपण जसे करतो तसेच करतात म्हणजेच नकलचे बंदर. तर त्या माकडाने टोपी घेतली आणि स्वतःच्या डोक्यात घातली त्याला तसे बघून बाकीचे सर्व माकडे उठले व त्यांनी सुद्धा ती टोपी त्यांच्या डोक्यामध्ये घातली व झाडावर जाऊन बसले टोपीवाल्याची झोप झाल्यानंतर जेव्हा ते उठला व आपले गाठोळे खाली बघितले तेव्हा तो खूप घाबरला व इकडे तिकडे बघायला लागला. वर बघतो तर काय सगळ्या माकडांनी त्याचे टोप्या त्यांच्या डोक्यात घातल्या होत्या; आता काय करावे तर. त्यांनी एक दगड घेतला व माकडांना मारला माकडाने सुद्धा झाडाला लागलेले आंबे तोडले आणि त्या टोपीवाल्याला मारले. नंतर टोपीवाल्यानी स्वतःच्या डोके खाजवले; त्याला तसं बघून माकडांनी पण डोके खाजवले "आता मात्र टोपीवालाच्या लक्षात आले की आपण जसं करतो तसेच हे माकड करतात." हे बघून टोपीवाल्याने आपली टोपी काढून जमिनीवर आपटली, टोपीवाल्याने असे करतात माकडांनी सुद्धा त्यांच्या डोक्यातली टोपी काढून खाली जमिनीवर फेकून दिली, हे बघून टोपीवाल्याला आनंद झाला त्याने आपल्या सर्व टोप्या पटापट गोळा केल्या व तिथून धूम ठोकली अशाप्रकारे टोपी वाल्याने आपल्या टोप्या परत मिळवल्या.


    तात्पर्य : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ

    9)ससा आणि कासव | Sasa Aani kasav | मराठी कथा

    9)ससा आणि कासव | Sasa Aani kasav | मराठी कथा


                   
    एका जंगलामध्ये ससा आणि कासव राहत होते. ते दोघे एकमेकांचे खूप छान मित्र होते. जंगलामध्ये ते एकमेकांसोबत खेळायचे, सोबत राहायचे असेच त्यांचे दिवस मजेत चालू होते. एकदा असं खेळता खेळता त्या दोघांमध्ये शर्यत लागली, ससा म्हणाला मी जास्त पडतो आणि कासव म्हणाला मी पण जास्त चालू शकतो; असे त्या दोघांचे बोलणे चालू होते त्यांच्या ते बोलणे ऐकून तेथे एक हरीण आले. ससा आणि कासवाने, हरणाला विचारले की," आमच्या दोघांपैकी कोण जास्त पडतो व चालू शकतो", हे तू आम्हाला सांग.हरिण म्हणाले," मी काही तुमच्या दोघांचा योग्य असा निर्णय करू शकणार नाही पण आपण एक करू शकतो की एक पैज लावू,त्या पैसे मध्ये जो जिंकला तो जास्त पडतो आणि चालू शकतो असा आपण निर्णय लावू. ससा आणि कासवाला पण ते मान्य झाले आणि त्यांनी पैज स्वीकारली. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवल्यानंतर दोघेही एका ठिकाणी आले व नंतर हरीणही आले व त्या दोघांची पैज असे लागली की "जो त्या डोंगराच्या पलीकडे लवकरात लवकर जाईल तो जिंकेल". असं म्हणून त्यांची पैज सुरू झाली बघतो तर काय? ससा जोरात पळाला तर कासव हळूहळू आपल्या गतीने चालत होते. बघता बघता ससा खूप समोर गेला;मागे वळून बघतो तर काय?  कासव खूप मागे होते .सशाने हे बघताच ससा एका झाडाखाली बसला व बसता बसता तेथे झोपून गेला आणि म्हणाला की कासव इथे पोहोचेपर्यंत माझी एक झोप होईल आणि मी लगेच जिंकून पण जाईल. असा विचार करत त्याला गाठ झोप लागली, इकडे बिचारे कासव हळूहळू चालत होते व आपली पैज जिंकण्यापर्यंत पोहोचत होते. रस्त्यात त्याला ससा झोपलेला दिसला व त्याने त्याला बघितले व हसला व हळूहळू आपल्या गतीने चालत राहिला. चालता चालता तो त्या डोंगराच्या पलीकडे कधी पोहोचला हे त्यालाही कळलं नाही आणि इकडे विचारा ससा हा झोपतेस राहिला झोपेतून जागे झाल्यावर त्याने मागे बघितले तर त्याला कासव दिसला नाही आणि त्याच गतीने सहसा पडत डोंगराच्या पलीकडे आला तर त्याला कासव पैसे जिंकण्याच्या ठिकाणी उभा दिसला व आपण हरलो हे त्याला कळून चुकले.


    अशाप्रकारे यातून आपल्याला हेच कळते की कधीच यश गाठायच्या मार्गामध्ये झोपायचं नसतं तर हळूहळू का होईना आपलं काम हे करत राहायचं असतं.


    तात्पर्य: कधीही कोणाला कमी समजू नये.

    10) कोल्हा आणि द्राक्ष | Fox & Grapes story|  

    मराठी कथा

    कोल्हा आणि द्राक्ष | Fox & Grapes story|   मराठी कथा


                   
     एकदा काय झाले एका जंगलामध्ये कोल्हा फिरत होता, त्याला खूप भूक लागली होती, तो काहीतरी खायला मिळेल ,या आशेने इकडे तिकडे पाहायला लागला व खाण्यासाठी काहीतरी शोधायला लागला. खूप वेळ झाला तरी त्याला काहीच खायला मिळाले नाही म्हणून तो खूप थकला होता. थकून - थकून तू इकडे तिकडे पुन्हा शोधायला लागला की मला काहीतरी खायला मिळू दे ,असं म्हणतच होता की त्याला समोर एक द्राक्षाचा वेल दिसला दिसला. त्याने मनात विचार केला की आपण थोडेच खायला शोधत होतो पण आपल्याला तर खूपच मोठा वेळ मिळाला व ही द्राक्ष आता आपण क्षणात संपवून टाकू असे त्याला वाटले, असा मनात विचार करून तो त्या वेलावर उड्या मारायला लागला त्याने ते द्राक्ष खायचा खूप प्रयत्न केला पण ते झाड उंच असल्यामुळे तो काही त्या द्राक्षा पर्यंत पोहोचू शकला नाही. शेवटी कोल्हा विचारा थकला आणि तिथून माघारी फिरला व असं म्हणाला की बरं झालं मला ते द्राक्ष मिळाले नाही ,आंबटच असतील.

    म्हणजे काय यालाच मिळाले नाही तर ते वाईट असणार


    तात्पर्य: गाढवाला गुळाची चव काय?



    अशा करते कि नवीन मराठी छान छान गोष्टी तुम्हाला खूप खूप आवडल्या असतील, अशाच मराठी गोष्टी शिकायच्या असतील तर नक्की पुन्हा भेट द्या।
    धन्यवाद 


    टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या
    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.