भारतीय संस्कृतीमध्ये लग्न संस्काराला खूप मोठे स्थान आहे, लग्न संस्काराच्या वेळी केवळदोन व्यक्ती हे एका नात्यांमध्ये बांधलेजात नसून दोन कुटुंब एकमेकांशी जुळले जातात. एखाद्याच्या घरात जेव्हा लग्न असते तेव्हा त्या घरामध्ये जी लगीन घाई असते ती वेगळीच असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा नवरदेव आणि नवरीला उखाणे घ्यायला लावतात त्यावेळी तर खूपच मजा येते,नवरीचे उखाणे, नवरदेवाचे उखाणे हे खूपच छान असतात. आजच्या या लेखांमध्ये मी तुम्हाला नवरदेव नवरीचे उखाणे,comedy उखाणे तसेच सोपे उखाणे, लांब उखाणे सांगणार आहे ते तुम्ही नक्की वाचा.
1)नवरीचे सोपे उखाणे:
- आई बाबा आशीर्वाद द्यावा, …… रावांचा सहवास मला जन्मभर लाभावा
- जाई जुई चा हार गुंफित होता माळी,. ……. रावांचं नाव घेते सायंकाळच्या वेळी
- पत्रिका जुळल्या योग आला जुळून,. …….. रावांचं नाव घेते भाग्य थोर म्हणून.
- भोगापेक्षा त्यागात असते खरे समाधान, …… रावांचे नावचे कुंकू लावून वाढला माझ्या आई-वडिलांचा अभिमान

- शिवसेनेच्या मेळ्यात नाही उखाण्याची आठवण, …… रावांच्या नावाची हृदयात साठवण
- रामाचे होते राज्य म्हणून भरताने नाकारले, ………. रावांच्या नावासाठी सौभाग्य पत्करले
- मराठी भाषेत प्रसिद्ध आहेत अलंकार उपमा व उत्प्रेक्षा, ……. राव सुखी राहो हीच माझी अपेक्षा
- ब्रह्मा विष्णू महेश तिने देव देत आहे आशीर्वाद साक्षात, …… रावांचं नाव घेते नीट ठेवा लक्षात
- जाई जुईच्या बागेत काचेचा बंगला, …….. रावांच्या संसारात जीव माझा रमला
- नीलवर्णी आकाशात चंद्र दिसतो साजरा, …… रावांनी मला सौभाग्याचा गजरा
- सागरा तू करुणेचा देव, मनातलं सारं काही तुला सांगावं,. …….. रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य मला द्यावं
- वसंत ऋतुच्या पहाटे ऐकू येते कोकिळाचे मधुर कुंजन, …… रावांचा सहवास मिळवण्यासाठी केले मंगळागौरीचे पूजन..
- वर्तमानपत्रात छापून आली वार्ता, …… रावांचं नाव घेते फक्त तुमच्याकरता
- आईची माया वडिलांची छाया, …… रावांचं नाव घेऊन पडते सर्वांच्या पाया
- संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा,…रावांच्या सुखदुःखात, माझा अर्धा वाटा.
- सासरची छाया, माहेरची माया,…आहेत, माझे सर्व हट्ट पुरवाया.
- जुईची वेणी जाईचा गजरा,..........आमच्य़ा दोघांवरती सगळ्यांच्या नजरा.
- सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही...…रावांचे नाव हळूच ओठी येई.
- मोगऱ्याच्या गजऱ्याचा मस्त सुटलाय सुगंध....…सोबत मला मिळाला, जीवनाचा आनंद !
- आग्रहाखातर नाव घेते, आशीर्वाद द्यावा..…रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा.
- आई ने केले संस्कार, बाबांनी केले सक्षम..…सोबत असताना, संसाराचा पाया होईल भक्कम.
- मारुतीच्या देवळाला सोन्याचा कळस...….च नाव घ्यायला मला नाही आळस्..
- सोन्याची अंगठी चांदीचं पैंजण..… रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण.
- चांदीच्या वाटीत सोन्याचा चमचा..…रावांचे नाव घेते, द्या आशीर्वाद तुमचा.
- हिरव्या हिरव्या साडीचा पिवळा काठ जरतारी..… रावांचे नाव घेताच येई चेहऱ्यावर तरतरी
2) मराठी उखाणे नवरदेवासाठी:
- जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.
- गाडीत गाडी डेक्कन क्वीन, ……. आहे माझी ब्युटी क्वीन.
- चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण, ………चे नाव घेऊन सोडतो कंकण.
- पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, … च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार,
- मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,…………….चे बरोबर बांधली जीवन गाठ.
- रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन, … च्या साथीने आदर्श संसार करीन.
- अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर, ………..माझी सर्वांपेक्षा सुंदर
- ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, ………चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
- .सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, ………… चे नाव घेतो……..च्या घरात.
- संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका, …चे नाव घेतो सर्व जण ऐका.
- कोरा कागज काळी शाई, … ला रोज देवळात जाण्याची घाई.
- जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध, … च्या सहवासात झालो मी धुंद.
- मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट, … बरोबर बांधली जीवनगाठ.
- निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात, अर्धागिनी म्हणुन … ने दिला माझ्या हातात हात.
- जीवनात लाभला मनासारखा साथी, माझ्या संसार रथावर … सारथी.
- चंद्रला पाहून भरती येते सागराला, … ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.
- हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी, … च्या जीवनात मला आहे गोडी.
- माझा आवडता ऋतू आहे वर्षा......ही माझी अरची अन मी हीचा परश्या
- स्वाराज्या साठी साडले मावळ्यानी रक्त ….. नाव घेतो हा शिवरायाचा भक्त
- सुंदर प्रेमाचे, सुंदर गाव, ……….च्या मेहंदीत, माझे नाव.
- राधे शिवाय कृष्णाला, उरनार नाही अर्थ, ….. शिवाय माझं, जीवनच व्यर्थ.
- हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात, … च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात.
- कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो …… ला जलेबी चा घास.
- पोर्णिमेचा चंद्र असतो गोल …….समोर माझ्या पैशाला पण नाही मोल.
- कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास, … देतो मी लाडवाचा घास.
- सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल, संसार करु सुखाचा … तु, मी आणि एक मुल.
- सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली, … राणी माझी घरकामाता गुंतली.
- माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप,…… ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप.
- तुझ्या सौंदर्याची चढली नशा मला, माझं मन तुझ्या मागे पळतंय,
- ……… माझे डोळे दिवस-रात्र, तुझीच वाट बघतंय.
- गोड मधुर आवाज करी श्रीकृष्णाची बासरी,…..ला घेऊन जातो मी तिच्या सासरी.
- उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात, माझ्या प्रेमाचा हार ……………….. च्या गळ्यात.
- काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात, प्रथम दर्शनीच भरली ……… माझ्या मनात…
- देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले, …… शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले.
- २ आणि २ होतात चार, …… सोबत करेल मी सुखाचा संसार.
- काळी माती हिरवे रान, हृदयात माझ्या….. चे स्थान.
- माझ्याशी लग्न करायला… झाली राजी, केल मी लग्न…..झाली माझी.
- पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे, ……चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे.
- सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप, ..मला मिळाली आहे अनुरूप.
- नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व, …आहे माझे जीवन-सर्वस्व.
- नंदनवनात अमृताचे कलश, …आहे माझी खुप सालस.
- संसाराच्या सागरात पती पत्नी नावाडी, … मुळे लागली मला संसाराची गोडी.
- देवळाला खरी शोभा कळसाने येते, … मुळे माझे गृहसौख्य दुनावते.
- जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र, … च्या गळ्यात बांधतो मंगळसुत्र.
- कोकिळेचा आवाज, वाटतो खूपच गोड …ला जपतो मी, जसा तळहाताचा फोड.
- अस्सल सोने चोविस कॅरेट, … अन् माझे झाले आज मॅरेज.
- मातीच्या चुली घालतात घरोघर, …झालीस माझी आता चल बरोबर.
- शंकरा सारखा पिता अन् पार्वती सारखी माता, … राणी मिळाली स्वर्ग आला होता.
- जीवनात लाभला मनासारखा साथी, माझ्या संसार रथावर … सारथी.
- ओझर गणपतीचा गोपुर बांधनारे होते कुशल. … चे नाव घेतो तुमच्या करीता स्पेशल.
3)comedy उखाणे :
- सर्व मिळून नाचू उडू, घालूया फुगड्या,
- कोकणात जाताना, गाडीत बसतात खूप हादरे,_________ रावांचे नाव घेते, आहेत खूप पादरे.
- नळावर पाणी भरताना, मारायचे लाईन,______ रावांनी अखेर केले, कोर्ट मॅरेज करून पेपर साईन.

- आय लायनर लावला कि, मुली दिसतात छान________ राव नेहमी, माझा मेकअप करतात घाण.
- फालुदा छान लागतो, जेव्हा असतो त्यात सब्जा,__________रावांच्या जीवावर, करेन मी मज्जा.
- बटाट्याला हिंदीमध्ये म्हणतात आलू,_______ राव दिसतात साधे, पण आहेत खूप चालू.
- संसार होईल सुखर,जेव्हा मी चिरेन भाजी, आणि ______ते लावतील कुकर.
- खुर्चीत खुर्च्या, प्लास्टिकच्या खुर्च्या,_______ रावांच्या बहिणी, जशा खुरासणी मिर्च्या.
- मुली पाणीपुरी खाताना, भैयाला बोलतात और तिखा दो,________ अग हगवण लागेल, तुझ्या आईचा घो.
- काम नाही येत, होते नेहमी गडबड,_________ करते नुसती, फुकटची बडबड.
- मेकअप केला कि दिसतात लोक, हिरो- हिरोईन सारखे,पण _____ चे नाक आहे, डुकरासारखे.
- तुझी आई माझी सासू, आणि माझी आई तुझी सासूबाई,_________ मला लग्नानंतर, करून टाक घरजावई.
- परीक्षेत नापास होतात, तरी घेतात विद्यार्थी पुरवणी,____ ने आणल्या, स्वतःसोबत २ करवली.
- दिवसभर आवडत, महिलांना चरायला,________ नेहमी कंटाळा करते, स्वयंपाक करायला.
- मुंबईला असताना, पटवल्या असतील खूप पोरी,________ रावांच्या गळ्यात पडली, गावची छोरी.
- मुंबई मध्ये मेट्रोचे काम झाल्यावर, लोक होतील सुखी,_______ राव नाही होणार मग, कामावर जायला दुखी.
- देवदासला वेडी करणारी, होती पारू,________ तुझ्यासाठी, सोडेन मी आजपासून दारू.
- शेरवाणीला लावल मी, सोन्याच बटन,_________ आहे माळकरी म्हणून सोडल मी, चिकन आणि मटण.
4)लांब उखाणे :
- कण-कण फुगली, मन-मन माती,
आत्याबाईच्या पोटी जन्मले राम,
राम गेले शेतात,
शेतातून आणल्या करडी,
करडीत झाल्या आरडी,
आरडीचं केलं तेल,
तेल ठेवलं शिक्यावर,
शिक तुटलं, मडकं फुटलं, वगळ गेला परसदार,
परसदाराचा पैका नाव कोण घेते ऐका,
नाव कोण घेती एक ……….ची लेक, रावांच
नाव कोण घेती गहीण ……….ची बहीण,
नाव कोण घेती कंथनी ………ची पुतणी,
नाव कोण घेती काशी ………ची मावशी,
नाव कोण घेती तानी ………रावांची राणी.
- मोहोळ गाव खेड,
स्वामी झाले वेडे,
स्वामींना लागले छंद,
छंदाला बाजूबंद,
स्वामी गेले बार्शी,
बार्शी घेतली गादी,
आणली सतरंजी,
पराज्याचा सुतार,
मोठा कारागिर,
जागा लागते सव्वा वीत,
आणला पलंग,
ठेवला घरी,
स्वामी गेले शहराला,
शहारापाठी घेतला चंद्रहार,
चंद्रहाराच सोन मोठ नाजुकदार घडणीस लागले तीन वार,
तिथ घेतली बोरमाळ,
बिरुदी मासूळ्याची घडण काय,
जोडव्याची घडण बरोबर नाय,
वाकडी नथ,
दुहेरी फासा,
स्वामी गेले मुंबई देशा,
तिथ घेतल्या साडया पैठण्या,
साडयापैठण्यांचा रंग उदी माश्या नावाचा रंग घेऊ नका,
फिक्कमलमली कुडत, जरतारी फेटा,
सान्या सिणगाराला शोभा आली,
तेथून स्वामी परत आले पहिला मुक्काम कुठे ?
सांगलीच्या पेठ,
तिथ घेतला मोत्याचा पदर,
तेथून स्वामी परत आले.
दुसरा मुक्काम कुठे?
कराड पेठ,
तिथ मोटार चाले हवापरी,
स्वामी आले आपले नगरी,
पाटपाणी करुन मंदिरी,
पाची पक्कवानांची केली तैयारी,
एवढयात आली, ……………… रावांची स्वारी
- नांव घ्या म्हणता, जीव माझा नेणतां,
दुधावरली साय, तूप लावूनी केली चपाती मऊ,
चपाती वरला भजा.
आनंदान जेवला राजा,
निरीचा बघा थाट,
ब्रह्मदेवाची गांठगांठ सोडावी राहनी उभा,
कपाळी शोभा कुंकवाची बघा,
बघा लल्लाटी खाली हळदीची दाटी.
हळदीचा पिवळा रंग.
कंबरपट्ट्याची कडी,
गरसुळी गाती,
आयना डाव्या हाती,
मुख न्याहाळीत होती,
हातांत सुवर्णाचा चुरा ……………… रावांच्या मंदीलाला सोन्याचा तुरा.
अशाप्रकारे आपण लग्न संस्काराच्या वेळी नवरदेव नवरींनी घ्यायचे उखाणे पाहिले आहेत तुम्हाला हे उखाणे कसे वाटले ते नक्की सांगा.







.png)









