मराठी भाषा गौरव दिन |

मराठी भाषा गौरव दिन | मराठी भाषा घोषवाक्य





            "महाकवी कुसुमाग्रज म्हणजे वि.वा. शिरवाडकर यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मायबोली मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो". युनेस्कोने सर्व भाषांना सन्मान देण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सण 2000 पासून २१ फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. पण एकच दिवस आपल्या मातृभाषेला सन्मान न देता संपूर्ण आठवडा म्हणजेच 21 ते 27 फेब्रुवारी मातृभाषा आठवडा म्हणून साजरा करण्यात येतो

आपल्या मराठी भाषेच्या वर्णनार्थ कविवर्य कुसुमाग्रज यांनी काही ओळी लिहिल्या त्या म्हणजेच,



माझ्या मराठी मातीचा लावा ,ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दरा खोऱ्यातील शिळ्या
रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी
चारी वर्णातूने फिरे, सरस्वतीची पालखी |

भाषा ही कोणतीही असो भाषेच्या माध्यमातून आपले विचार,आचार, आपली संस्कृती आणि आपले मत आपल्याला योग्य प्रकारे समोरच्यापर्यंत पोहोचवता येते. संपूर्ण जगामध्ये अनेक प्रकारच्या भाषा बोलल्या जातात भाषांचे दोन प्रकार एक प्रमाणभाषा,दुसरी बोलीभाषा. प्रमाण भाषेचा उपयोग हा प्रशासकीय कामामध्ये केला जातो;तर बोलीभाषेचा उपयोग हा प्रामुख्याने आपल्या विचारांचा आदान प्रदान करण्यासाठी होते.

आपली मातृभाषा कोणतीही असू शकते. आपल्या घरामध्ये जे लोक बोली भाषेमध्ये बोलतात. ती आपली माय भाषा असते ती आपल्याला शिकवावी लागत नाही लहान मुले जन्मापासून आपल्या मोठ्यांचे अनुकरण करत असतात व आपल्या आईच्या जवळच असतात. आपल्या आईची भाषा ते शिकतात म्हणजेच माय भाषा शिकतात, तीच आपली मातृभाषा.
असे म्हणतात की दर बारा कोसावरभाषा बदलते.

आज खरं तर आपली ही मायबोली मराठी भाषा टिकेल का ? असा प्रश्न अनेक जणांच्या मनात आहे. पण मला इथे सांगावेसे वाटते की हो आपली मायभाषा नक्कीच टिकेल, कविवर्य कुसुमाग्रज असे म्हणतात की माणसाचा विकास व्हायचा असेल तर तो त्याच्या मातृभाषेतच होत असतो. पण आज पालकांमुळे मुलांना मातृभाषेतून शिक्षण मिळत नाही; आमच्या मुलांना फक्त इंग्रजी यावे व समोर त्यांना काही प्रश्न निर्माण 
न व्हावी यासाठी ते त्यांना इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. पण आपण कितीही इंग्रजी बोललो तरी आपली मायबोली तर मराठी ना?.
          मला एवढेच म्हणायचे आहे की आपणाला कितीही भाषा येऊ दे पण आपली जी मातृभाषा मराठी आहे त्याचे आपल्याला योग्य प्रकारे वाचन करता यायला हवे; लिखाण करता यायला हवे. कारण ती भाषा आपली आहे आणि आपण त्या भाषेचे आहोत.जर तेच आपल्याला योग्य प्रकारे आले नाही तर मग काय उपयोग आपल्या मराठी असल्याचा.


मराठी भाषा घोषवाक्य


मराठी भाषा गौरव दिन | मराठी भाषा घोषवाक्य



-लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी,
एवढया जगात माय मानतो मराठी…




-स्वराज्य तोरण चढे,
गर्जती तोफांचे चौघडे,
मराठी पाऊल पडते पुढे !


-“वाहते रक्तातं माझ्या मराठी
गर्वांने सांगतो, आहे मी मराठी,
संस्कृती माझी माय ती मराठी
अभिमानाची ती माय मराठी ”


-“ज्ञानदेव बाळ माझा
सांगे गीता भगवंता
लक्ष द्या हो विणविते
मराठी मी त्याची माता
जागतिक मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा..


-माझा शब्द माझे विचार ,
माझा श्वास माझी स्फूर्ती ,
माझ्या रक्तात मराठी ,
माझी माय मराठी !!

-माझा शब्द माझे विचार ,
माझा श्वास माझी स्फूर्ती ,
माझ्या रक्तात मराठी ,
माझी माय मराठी !!


-“पुन्हा मानव जन्म मिळाला तर….
फक्त मराठीच होईन….”

-बोलावे शुद्ध, ऐकावे शुद्ध,
वाचावे शुद्ध, लिहावे शुद्ध,
मराठीच्या उद्धारासाठी,
कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध....
 


मनोगत



शेवटी मला हे सांगावेसे वाटते की आपली माय मराठी आहे,तिला जपा आपल्या मराठीला विसरू नका. इंग्रजी शिका सोबत अनेक काही भाषा शिका पण आपली मायबोली आहे तिला विसरू नका. अशा अनेक गोष्टी आहेत, तिच्या आपण मराठीतच वाचल्या तर आपल्याला खूप आवडतात आणि मुख्य म्हणजे खूप जास्त जणांना समजतात. माझ तर असा आहे इंग्रजी कितीही बोला पण मन मराठी बोलूनच भरते.


धन्यवाद | |

प्रश्न तुमचे उत्तर आमचे


1)मराठी राजभाषा दिन कधी आहे?

-महाकवी कुसुमाग्रज म्हणजे वि.वा. शिरवाडकर यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो"

2)कोणाचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून पाळला जातो?
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी कवी कुसुमाग्रज म्हणजे वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणजेच 27 फेब्रुवारी हा मराठी दिन म्हणून पाळला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.