त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, नाशिक संपूर्ण माहिती

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, नाशिक संपूर्ण माहिती


श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर हे नाशिक जिल्यात स्थित आहे. त्र्यंबकेश्वर हे प्राचीन हिंदू मंदिर आहे, जे नाशिक पासून 28 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर हे भगवान भोलेनाथ म्हणजेच महादेवाच्या १२ ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. हे भारतातील पवित्र  असे मंदिर आहे. या मंदिरातील महादेवाच्या पिंडीला तीन मुख  आहेत आणि असे म्हटले जाते की हे तीन त्रिदेव आहेत म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश. या पिंडीच्या भोवती एक रत्नचरित मुकुट ठेवलेला आहे त्याला असे म्हटले जाते की तो त्रिदेव मुकुट आहे .या मुकुटाची अशी आख्यायिका आहे की ते पांडवांच्या काळापासून येथे ठेवलेले आहे त्यामध्ये हिरा पन्ना असे अनेक  रत्नजडित आभूषणे आहेत. या सोन्याच्या मुकुटाच्या दर्शनाची वेळ ही ब्रह्म मुहूर्तावर असते म्हणजेच सकाळी साडेचार ते पाच वाजेपर्यंत, आपल्याला त्या मुकुटाचे दर्शन करता येते.

     


    मंदिर निर्माण कार्य :


    या मंदिराचा पुननिर्माण तिसरे पेशवा म्हणजेच बाळासाहेब पेशवा यांनी केला होता. (१७४०-१७६०) या मंदिराच्या निर्माण कार्यासाठी सोळा लाख रुपये खर्च झाले. त्र्यंबकेश्वर मंदिर सिंधू  आर्यशाली पद्धतीचा अद्भुत नमुना आहे.त्र्यंबकेश्वरच्या परिसरामध्ये कुशावर्त तीर्थ आहे जे गोदावरी नदीचा  भाग आहे. या कुंडाला बाराही महिने पाणी असते. 


    मंदिराचा इतिहास / त्र्यंबकेश्वर मंदिर पौराणिक कथा :


    महर्षी गौतम ऋषी हे तपवनात काही ब्राह्मणांसोबत राहत होते, त्या बाकीच्या ब्राह्मणांचे बायका या काही कारणास्तव महर्षी गौतम ऋषी यांच्यावर रागावल्या होत्या;त्यामुळे त्यांनी आपल्या पतीला महर्षी ऋषींना या तपोवन आतून हाकलून लावावे असे त्यांचे पतीला सांगितले. व ते ब्राह्मण आपल्या पत्नीच्या हट्ट पुढे हरले व त्यांनी महर्षी ऋषींना आश्रमातून हाकलून लावायचा विचार केला. त्यासाठी त्यांनी भगवान गणेश यांचे आराधना केली व त्यांना प्रसन्न करून घेतले व वरदान स्वरूपामध्ये भगवान गणेश यांच्याकडून असा आशीर्वाद घेतला की महर्षी ऋषी यांना या आश्रमातून ते हाकलून लावतील, भगवान गणेशही आपल्या भक्तांच्या हट्ट पुढे हरले व त्यांनी एक गाय चे रूप धारण करून त्या तपोवन मध्ये ते पीक चरू लागले. गायला पीक चरताना बघून महर्षी ऋषी तेथे आले व त्यांनी गायला पेंडा खायला दिला तो पेंड तोंडात घेता ती गाय मरण पावली गाय मेलेली बघून तेथे हाहाकार माजला व ऋषीवर गो हत्यारा म्हणून आरोप आला व त्यानंतर त्यांना बाहेर हाकलून देण्यात आले
                        ब्राह्मणांनी गौतम ऋषींना सांगितले की तुम्ही आता येथे कोणत्याही प्रकारचे यज्ञ आणि पूजा पाठ करण्यास योग्य नाही, तुम्ही एक गो  हत्यारे आहात, तुम्ही येथे राहिलास आम्हालाही ते पाप लागेल, या पापातून मुक्त होण्यासाठी काहीतरी उपाय सांगा, मला मदत करा, असे गौतम ऋषी यांनी विचारल्यास तेव्हा ब्राह्मण म्हणाले, तुम्ही तुमचं पाप सगळ्यांना सर्वत्र सांगत फिरा व पृथ्वीला तीन वेळा परिक्रमा करा, मग परत इकडे येऊन एक महिना व्रत करा त्यानंतर ब्रह्मगिरी पर्वतावर 101 परिक्रमा घाला, एवढे नव्हे तर मग गंगेच्या पाण्याने स्नान करून एक करोड पार्थिव शिवलिंग ची  आराधना करा,  त्यानंतर पुन्हा गंगेत स्नान करा व एवढे सगळे झाल्यावर ब्रह्मगिरी पर्वताचे 11 परिक्रमा करा मग पुन्हा शंभर घोड्याच्या पवित्र जल पार्थिव शिवलिंगावर अर्पण करा एवढे सगळे जर तुम्ही करू शकले तरच तुमचा उद्धार होईल, तुमची शुद्धी होईल, ह्या सगळे उपाय महर्षी गौतम ऋषी यांनी केले व भगवान शिव यांची आराधना केली व मनोभावे त्यांची सेवा केली व जे जे ब्राह्मणांनी सांगितलं ते सगळं त्यांनी पूर्ण केलं,  हे सगळं बघून ,त्यांची भक्ती बघून, त्यांची पुण्य बघून, त्यांचे आराधना बघून, त्यांचा देवावरचा विश्वास बघून, भगवान भोलेनाथ, आपले भोले सदाशिव , प्रकट झाले व त्यांनी त्यांना वरदान मागितल्यास सांगितले तेव्हा फक्त ऋषी यांनी एवढेच म्हटले की मला गोहत्तेमधून मुक्त करा,  माझे पाप नष्ट करा , तेव्हा आपले शिवजी म्हणाले की तुझ्यावर कोणताही प्रकारचे पाप नाही ,हे पाप तुला तुझ्या आश्रमातील ब्राह्मणांनी तुझ्यावर झोपले होते म्हणून मी त्यांना शिक्षा कर इच्छितो तेव्हा गौतम ऋषि म्हणाले; की रागावू नका पण त्यांच्यामुळेच मला तुमच्या दर्शन प्राप्त झाले त्यांच्यामुळेच मला तुमचा आशीर्वाद मिळाला.  तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही कायमस्वरूपी या ब्रह्मगिरी पर्वतावर रहा तेव्हा भगवान ऋषी आणि देवगन सर्वांनी मिळून एकत्र प्रार्थना केली आणि ते प्रार्थना भगवान शिव यांनी स्वीकारली व त्र्यंबक ज्योतिर्लिंग च्या स्वरूपामध्ये कायमस्वरूपी ते या ठिकाणी स्थित झाले. 


    त्र्यंबकेश्वर मंदिर वैशिष्ट्य \त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग का रहस्य :

    त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, नाशिक संपूर्ण माहिती


    • पवित्र “गंगा गोदावरी” नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वराच्या जवळ आहे.
    • त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडी मध्ये अंगठ्याच्या आकाराच्या तीन कपार आहेत. महादेवाचे भक्त असे मानतात कि ह्यात त्रिदेव वास करतात,म्हणजेच ब्रह्मा,विष्णू आणि महेश. 
    • जवळपास ३५० वर्षांपासून या ज्योतिर्लिंगावर “त्रिकाल पूजा” केली जाते, अशी आख्यायिका आहे. 
    • त्र्यंबकेश्वर मंदिराची वेळ सकाळी ७ ते रात्री ८ आहे. भाविक भक्तांनी याच वेळेत मंदिरात जावे जेणेकरून गैरसोय होणार नाही. 
    • संत ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू संत निवृत्तीनाथ यांनी त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली होती.

    मंदिरातील पुजेची वेळ:

    1. भगवान शंकर्जींच्या सोन्याच्या मुकुटाचे दर्शनाची वेळ : सकाळच्या ४.३० ते ५.०० वाजेपर्यंत
    2. सकाळची मंगल आरती ची वेळ : ५.३० ते ६.०० वाजेपर्यंत.
    3. मंदिरातील अभिषेक : सकाळचे ६.०० ते ७.०० वाजेपर्यंत.
    4. मंदिराच्या बाहेरील अभिषेक : सकाळचे ७.०० ते दुपारच्या १२ वाजेपर्यंत.
    5. रुद्राभिषेक, महामृत्युंजय जप : सकाळच्या ७ ते सकाळच्या ९ वाजेपर्यंत.
    6. दुपारची पूजा : दुपारचे १.०० ते १.३० वाजेपर्यंत.
    7. संध्याकाळची आरती : रात्री ७.०० ते ९.०० वाजेपर्यंत.

    मंदिरामध्ये केले जाणारे विधी :

    • कालसर्व  शांती 
    • त्रिपिंडी विधी 
    • नारायण नागबली पूजा केली जाते. 

     

    त्र्यंबकेश्वर मंदिर जवळपास ठिकाण 

    त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, नाशिक संपूर्ण माहिती



    1. ब्रह्मगिरी पर्वतावरील 
    2. गोदावरी नदी उगंम  स्थळ 
    3. राम कुंड 
    4. लक्ष्मण कुंड 
    5. भगवान हनुमान जन्मस्थळं 
    6. हरिहर फोर्ट 

    मंदिरात कसे जावे :

    • ट्रेन : - नाशिक ट्रेन पकडायची आणि मंदिर जाण्यासाठी टॅक्सी, बस नि जावे 
    • हवाई मार्ग:-  नासिक एअरपोर्ट आहे जो कि मंदिरापासून ५५ किमी अंतरावर आहे. 

    मंदिरात जाण्यासाठी येणार खर्च :

    • नाशिक ते  त्र्यंबकेश्वर मंदिर बस
          AC बस तिकीट 90/-
         Non AC बस तिकीट 68 /-
    • नाशिक रेल्वे स्टेशन च्या बाहेरून आपल्याला private  टॅक्सी मिळते नासिक ते मंदिर 1000-1200 Rs/-
    • Sharing मध्ये सुद्धा गाडी मिळते rate 150 प्रति व्यक्ती.
    • जेवणाची व्यवस्था मंदिराच्या परिसराच्या हॉटेल मध्ये आहे. 

    राहण्याची व्यवस्था :

    • गजानन महाराज संस्थान आहे. मंदिरापासून 1.5 किमी अंतरावर.
    • मंदिराच्या परिसरात खूप छान धर्मशाळा आहेत. मंदिराच्या समोरच धर्मशाळा आहेत, मंदिराच्या परिसरात हॉटेल पण आहेत, तेथील किराया 400-1500/-  पर्यंत आहे. 
    अशा करते कि तुम्हाला  त्र्यंबकेश्वर मंदिर माहिती नक्की आवडली असणार, माज्या बाकीच्या ब्लॉग ला वाचायला विसरू नका. 
    धन्यवाद |


    FAQs:


    1) त्र्यंबकेश्वर मंदिरात किती वाजता जायचे?
    -त्र्यंबकेश्वर मंदिराची वेळ सकाळी 5 ते रात्री 8 आहे. भाविक भक्तांनी याच वेळेत मंदिरात जावे जेणेकरून गैरसोय होणार नाही.


    2) त्र्यंबकेश्वरचे वय किती आहे?
    - त्र्यंबकेश्वर मंदिर 1000 वर्षे जुने मंदिर आहे.


    3)त्र्यंबकेश्वर का प्रसिद्ध आहे?
    -त्र्यंबकेश्वर मंदिर हे भगवान भोलेनाथ म्हणजेच महादेवाच्या १२ ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे.


    4)त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनाचा खर्च किती?
    -नाशिक ते त्र्यंबकेश्वर मंदिर बस, AC बस तिकीट 90/, Non AC बस तिकीट 68 /-


    5)त्र्यंबकेश्वर मंदिरात मी काय परिधान करावे?
    -पूजेसाठी पुरुषांनी पांढरे धोतर आणि महिलांनी साडी नेसणे आवश्यक आहे .


    6)नाशिक आणि त्र्यंबकेश्वर एकच आहे का?-
    -श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर हे नाशिक जिल्यात स्थित आहे. त्र्यंबकेश्वर हे प्राचीन हिंदू मंदिर आहे, जे नाशिक पासून 28 किलोमीटर अंतरावर स्थित आहे.



    7)त्र्यंबकेश्वर मंदिर कोणी बांधले?
    -या मंदिराचा पुननिर्माण तिसरे पेशवा म्हणजेच बाळासाहेब पेशवा यांनी केला होता. (१७४०-१७६०).


    8)नाशिकला भेट कशाला?
    -ब्रह्मगिरी पर्वतावरील ,गोदावरी नदी उगंम स्थळ ,राम कुंड ,लक्ष्मण कुंड
    ,भगवान हनुमान जन्मस्थळं ,हरिहर फोर्ट पाहण्यासारखे ठिकाण आहेत.






    टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या
    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.