मराठी वाचकांना माझा मनापासून नमस्कार.
माझ्या "मराठी जगत" या ब्लॉगवर आपले मनापासून स्वागत.
माझे नाव प्रिया मंगेश बोरसे मला वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. मी एक महाराष्ट्रीयन असून मला माझ्या मराठी भाषेचा खूप अभिमान आहे. मराठी जगत या ब्लॉगवर आपल्याला महाराष्ट्र दर्शन, मराठी गौरव गाथा, थोर चरित्र, मराठी उद्योग, आणि मराठी बोधकथा या सर्वांची माहिती मिळणार आहे.
महाराष्ट्र दर्शन मध्ये संपूर्ण महाराष्ट्र, महाराष्ट्रातील जिल्ह्यांची माहिती, किल्ले ,मंदिर ,प्रेक्षणीय स्थळ आणि निसर्गरम्य स्थळ या सर्वांचे माहिती तुम्हाला मिळणार आहे तरी ती सुद्धा आवर्जून वाचावी.
मराठी गौरव गाथेमध्ये मराठी सण, भक्ती परंपरा, खाद्यपदार्थ ,मनाचे श्लोक ,तुकारामांचे अभंग आणि अनेक अशा गोष्टी तुम्हाला वाचायला मिळणार आहे,ज्यामुळे मला माझ्या मराठी भाषेचा सार्थ अभिमान वाटतो.
थोर चरित्रांमध्ये सर्व थोर महात्म्यांचे चरित्र तुम्हाला मराठीमध्ये या ब्लॉगवर मिळणार आहे.
मराठी उद्योगांमध्ये आपण कोणते उद्योग करू शकतो आणि ते आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत या सर्वांची माहिती आपल्याला उद्योगांमध्ये मिळणार.
मराठी बोधकथेमध्ये लहान मुलांना उपयुक्त अशा बोधकथा आणि Moral Stories in Marathi ब्लॉगवर उपलब्ध उपलब्ध आहेत.
जय मराठी | जय महाराष्ट्र ||
धन्यवाद ||