बाबासाहेब आंबेडकर विचार मराठी | Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे थोर विचारवंत होते त्यांनी एक सशक्त समाज निर्माण केला व शिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून दिले. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार Dr. Babasaheb Ambedkar Quotes in Marathi, आपण आजच्या लेखांमध्ये बघणार आहोत.


बाबासाहेब आंबेडकर विचार मराठी | Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर माहिती:


भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एक प्रमुख भारतीय न्यायशास्त्रज्ञ, समाजसुधारक आणि राजकारणी होते. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी एका दलित कुटुंबात झाला. बाबासाहेब हे एका दलित कुटुंबामध्ये जन्माला आलेले असल्यामुळे दलितांचे दुःख काय आहे?, त्यांना काय व्यथा आहे?, हे सगळे ते जाणून होते,समजून होते, म्हणून समाजातून त्या सर्व गोष्टी दूर व्हाव्या यासाठी ते सदा कार्यरत राहिले व एवढेच नव्हे तर त्यांनी आपले जीवन सामाजिक विषमता, भेदभाव आणि अस्पृश्यतेविरुद्धच्या संघर्षासाठी समर्पित केले.


डॉ.आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार होते आणि त्यांनी राष्ट्राच्या मूलभूत अधिकार आणि तत्त्वांचा मसुदा तयार करण्यात आणि आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी सामाजिक न्यायाचे समर्थन केले आणि उपेक्षित समुदायांच्या, विशेषत: दलित म्हणजेच (पूर्वी अस्पृश्य म्हणून ओळखले जाणारे) यांच्या हक्कांसाठी वकिली केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे समाजातील अत्याचारित घटकांच्या उत्थानासाठी होकारार्थी कृती आणि आरक्षण धोरणांचा संविधानात समावेश करण्यात आला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात शिक्षणाला अत्यंत महत्त्व होते, म्हणूनच ते शिक्षणाचे खंबीर पुरस्कर्ते होते समाजाच्या सशक्तीकरणासाठी आणि सामाजिक बदलासाठी शिक्षण एक महत्त्वपूर्ण साधन आहे असे बाबासाहेब मानत होते. केवळ एवढेच नसून, बाबासाहेब आंबेडकर स्वतः एक निपुण विद्वान होते, त्यांनी भारत आणि विदेशातील प्रतिष्ठित संस्थांमधून पदव्या मिळवल्या होत्या. त्यांनी दलित आणि इतर उपेक्षित गटांमध्ये शिक्षणाला प्रोत्साहन दिले आणि जाती-आधारित भेदभावाचे बंधन तोडण्यासाठी त्याच्या महत्त्वावर जोर दिला.


कायदा आणि राजकारणाच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाव्यतिरिक्त, आंबेडकरांनी मुक्तीचा मार्ग म्हणून बौद्ध धर्म स्वीकारला आणि जातिव्यवस्थेपासून मुक्त होण्यासाठी दलितांचे बौद्ध धर्मात मोठ्या प्रमाणावर धर्मांतर सुरू केले. त्यांनी समता, न्याय आणि बंधुत्वावर आधारित समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत महत्वपूर्ण असे कार्य केले 
त्यांचे थोर विचार आपण आज या लेखामध्ये पाहणार आहोत.


बाबासाहेब आंबेडकर विचार मराठी: 


  • इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा त्यांच्यातील सदगुण शोधावे.
                           – डॉ. बाबासाहेब आंबेडकर


  • मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.– डॉ. बाबासाहेब आंबेडकर


  • तिरस्कार माणसाचा नाश करतो.– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • "मला स्वातंत्र्य समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो."
                                    - Dr. Babasaheb Ambedkar

बाबासाहेब आंबेडकर विचार मराठी 

बाबासाहेब आंबेडकर यांचे थोर विचार | Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi.



  • "माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला गुडगाभर ज्ञानात जाता येईल." – डॉ. बाबासाहेब आंबेडकर



  • "भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत. या जाती देशविघातक आहेत. कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात."– डॉ. बाबासाहेब आंबेडकर



  • "लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे. लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती."– डॉ. बाबासाहेब आंबेडकर


  • "बर्फाच्या राशी उन्हांने वितळतात, पण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात."– डॉ. बाबासाहेब आंबेडकर


  • बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे.
                                      —डॉ बाबासाहेब आंबेडकर.

बाबासाहेब आंबेडकर यांचे थोर विचार | Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi.


  • "धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही. तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे." – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • "मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती व स्वास्थापेक्षा अधिक असते."– डॉ. बाबासाहेब आंबेडकर


  • "कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजातल्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते". – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • "शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा !"

                                  —डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

बाबासाहेब आंबेडकर यांचे थोर विचार | Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi.

  • "मानवी आयुष्यातील ज्ञान ही पायाभूत गोष्ट आहे. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढावी आणि टिकावी; तसेच त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील रहावे."
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर



  • "आपण शिकलो म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. शिक्षणाचे महत्त्व आहे, यात शंका नाही, मात्र शिक्षणाबरोबरच माणसाचे शीलही सुधारले पाहिजे… शीलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य आहे."– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • "मुला-मुलींना शिक्षण द्या, परंपरागत कामांत गुंतवू नका."
 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर


  • "ग्रंथ हेच गुरू". – डॉ. बाबासाहेब आंबेडकर


  • "आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका."

                                                          – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

      बाबासाहेब आंबेडकर विचार मराठी 


बाबासाहेब आंबेडकर विचार मराठी | Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi.




  • "वाचाल तर वाचाल."– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • "माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी ज्ञानसागराच्या कडेला गुडघाभर पाण्यात जाता येईल". – डॉ. बाबासाहेब आंबेडकर


  • "मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो." – डॉ. बाबासाहेब आंबेडकर


  • "शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे". – डॉ. बाबासाहेब आंबेडकर



  •  "लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’".

                                                      – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

                                                      

बाबासाहेब आंबेडकर विचार मराठी | Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi.


  • "मी एखाद्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप त्या समाजातील महिलांच्या झालेल्या प्रगतीवरून करतो." – डॉ. बाबासाहेब आंबेडकर


  • "शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही." – डॉ. बाबासाहेब आंबेडकर


  • "प्रज्ञा, शील, करुणा, विद्या आणि मैत्री या पंचतत्त्वांवर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनवले पाहिजे."– डॉ. बाबासाहेब आंबेडकर


  • "शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही". – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • "अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भिषण आहे."

                                                  – डॉ. बाबासाहेब आंबेडकर


बाबासाहेब आंबेडकर विचार मराठी 

बाबासाहेब आंबेडकर विचार मराठी | Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi.


  • "तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात." – डॉ. बाबासाहेब आंबेडकर


  • "शिक्षण हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. वेळ आली तर उपाशी रहा पण आपल्या मुलां-बाळांना शिक्षण द्या." – डॉ. बाबासाहेब आंबेडकर


  • “शिक्षण हे माणसाला निर्भय बनवते, त्याला एकतेचा धडा शिकवते, त्याला त्याच्या हक्कांची जाणीव करून देते आणि त्याच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देते.”- डॉ. बाबासाहेब आंबेडकर


  • "लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे शस्त्र आहे."– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • "सर्वांनी आपण प्रथम भारतीय आणि अंततही भारतीय ही भूमिका घ्यावी."

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर


बाबासाहेब आंबेडकर विचार मराठी 

बाबासाहेब आंबेडकर विचार मराठी | Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi.


  • "लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे शस्त्र आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • "माझे सर्व आयुष्य विद्यार्थी म्हणून जावे अशी माझी इच्छा होती". – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • "शिक्षण हीच खऱ्या अर्थाने जीवनाच्या प्रगतीकरिता महत्त्वाची बाब होय." – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • "विद्यार्थी दशेत ज्ञानर्जन चालू असता त्यांनी आपल्यापुढे निरंतर ‘ज्ञानर्जन’ हे एकच ध्येय ठेवावे".- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • "चारित्र्य शोभते संयमाने, सौंदर्य शोभते शीलाने".

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर



बाबासाहेब आंबेडकर विचार मराठी | Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi.


  • "शील आणि शिक्षण ही जवळ असल्याशिवाय मनुष्याला या जगात काहीच साध्य करून घेता येणार नाही."– डॉ. बाबासाहेब आंबेडकर


  • "ज्ञान आणि विद्या या गोष्टी काही पुरुषांसाठीच नाहीत; त्या स्त्रियांसाठीही आवश्यक आहेत."– डॉ. बाबासाहेब आंबेडकर


  • "निर्भय व्हा व जगाचे राज्य मिळवा,’ हेच माझे तरुण विद्यार्थ्यांना सांगणे आहे." – डॉ. बाबासाहेब आंबेडकर


  • "शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे."

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर


बाबासाहेब आंबेडकर विचार मराठी | Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi.




  • "शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि हा अधिकार कुणालाही नाकारता येणार नाही." – डॉ. बाबासाहेब आंबेडकर



  • "शिक्षणाशिवाय आपल्याला मोक्याच्या जागा काबीज करता येणार नाही". – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • "ज्ञान आणि विद्या या गोष्टी काही पुरुषांसाठीच नाहीत; त्या स्त्रियांसाठीही आवश्यक आहेत." – डॉ. बाबासाहेब आंबेडकर


  • "शिक्षणाशिवाय आपल्याला मोक्याच्या जागा काबीज करता येणार नाही". – डॉ. बाबासाहेब आंबेडकर


  • "पावलागणिक स्वत:च्या ज्ञानात भर टाकित जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते."

    – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर विचार मराठी 

बाबासाहेब आंबेडकर विचार मराठी | Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi.


  • "जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एका रुपयाची भाकरी घ्या आणि एका रुपयाचे पुस्तक घ्या. कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसे जगायचे हे शिकवेल."
 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर



  • "व्यक्तीला अस्तित्वाची, क्षमतांची आणि सामर्थ्याची जाणीव करून देते ते शिक्षण होय." – डॉ. बाबासाहेब आंबेडकर


  • "शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि हा अधिकार कुणालाही नाकारता येणार नाही."
 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर



  • "पावलागणिक स्वत:च्या ज्ञानात भर टाकित जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते."

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर


बाबासाहेब आंबेडकर विचार मराठी | Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi.




डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा, लवचिकता, धैर्य आणि सामाजिक सुधारणेचे प्रतीक म्हणून लाखो लोकांना प्रेरणा देत आहे. सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांनी भारताच्या इतिहासावर अमिट छाप सोडली आहे आणि राष्ट्राच्या न्याय आणि समानतेच्या प्रयत्नांना आकार देत आहे. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले, परंतु त्यांच्या कल्पना आणि शिकवणी आजही प्रासंगिक आणि प्रभावशाली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.