लहान मुलांना अतिशय आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे ते बालकविता होय. या कवितेच्या माध्यमातून ते आपला आनंद शोधतात व त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आपणही समाधानी होतो. पण सध्याच्या युगामध्ये फक्त मोबाईल मधून मुलं काही गाणी ऐकतात, पण आपल्या वेळेस ही जी गाणी होती, ज्या बालकविता होत्या त्या काही वेगळाच होत्या. आज या ब्लॉगच्या माध्यमातून मी आपल्या समोर काही बालकविता आणणार आहे. ज्या बघून वाचून तुम्हाला नक्कीच आनंद होईल व आपलं बालपण आठवेल, चला तर मग बघूया बालगीते बालकविता.
1) दिन दिन दिवाळी,
गाई म्हशी ओवाळी,
गाई म्हशी कोणाच्या?
लक्ष्मणाच्या.
लक्ष्मण कुणाचा?
आई बापाचा.
2)माकडा माकडा हूप हूपउड्या मार खूप खूप
माकडाने उडी मारली वर
जाऊन बसले झाडावर

3) चांदोमामा चांदोमामा भागलास का?
लिंबोणीच्या झाडामागे लपलास का?
लिंबोणीचे झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी,
मामाच्या वाड्यात येऊन जा,
तूप रोटी खाऊन जा.

4) ससा ससा दिसतो कसा?
कापूस पिंजून ठेवलाय जसा,
लाल लाल डोळे छान
लहान शेपूट,मोठे कान
पाला खाऊन
चाहुल लागतात
Top Stories Marathi Katha
5)चिंगीचा फुगा टेबलावर ठेवला,
उंदीर मामा त्यावर चढला,
टमटम फुगा,
पटकन फुटला,
उंदीर मामा धूम पळाला.

6) पाळण्याची दोरी हळूहळू हलते
5)चिंगीचा फुगा टेबलावर ठेवला,
उंदीर मामा त्यावर चढला,
टमटम फुगा,
पटकन फुटला,
उंदीर मामा धूम पळाला.

6) पाळण्याची दोरी हळूहळू हलते
पाळण्यात बाळ एकटेच खेळते
टांगलेले खेळणे गोल गोल फिरते
त्याच्याकडे बाळ टुकूटुकू बघते

7) मनीमाऊ एकदा आजारी पडली
उंदीर मामांची मज्जा झाली
नाचू लागले ते घरभर
मनीला म्हणाले तू आम्हाला धर
मनी माऊ आपली हळूच उठली
उंदीर मामांनी धूमच ठोकली

8) घरट्यातून चिमणी भुरकन उडाली
पटकन चोचित दाणे घेऊन आली
झटकन पिल्लू चिऊ चिवत आलं
मटकन खाऊन घरट्यात गेलं

9) बेडूक दादा बेडूक दादा
डराव डराव करता करता
पाणी आणि चिखलात छान तुम्ही खेळता
चिखलात खेळून सर्दी होईल
कडू कडू औषध
आई मग देईल

10) चिंचेचे झाड खूप खूप मोठे
चिंचेचे पान इवले इवले छोटे
चिंचेला येतात छोटी छोटी फुले
चिंचेखाली खेळतात खूप खूप मुले
झाडाला येतात छोटे मोठे आकडे
आंबट-बोटुक मुलांना आवडे
Read More
त्याच्याकडे बाळ टुकूटुकू बघते

7) मनीमाऊ एकदा आजारी पडली
उंदीर मामांची मज्जा झाली
नाचू लागले ते घरभर
मनीला म्हणाले तू आम्हाला धर
मनी माऊ आपली हळूच उठली
उंदीर मामांनी धूमच ठोकली

8) घरट्यातून चिमणी भुरकन उडाली
पटकन चोचित दाणे घेऊन आली
झटकन पिल्लू चिऊ चिवत आलं
मटकन खाऊन घरट्यात गेलं

9) बेडूक दादा बेडूक दादा
डराव डराव करता करता
पाणी आणि चिखलात छान तुम्ही खेळता
चिखलात खेळून सर्दी होईल
कडू कडू औषध
आई मग देईल

10) चिंचेचे झाड खूप खूप मोठे
चिंचेचे पान इवले इवले छोटे
चिंचेला येतात छोटी छोटी फुले
चिंचेखाली खेळतात खूप खूप मुले
झाडाला येतात छोटे मोठे आकडे
आंबट-बोटुक मुलांना आवडे
मनोगत
लहान मुलांना आवडतील अशाच बालकविता मी या ब्लॉगमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला त्या आवडल्यास आणखी काही कविता आहे त्यांना भेट द्या.Read More


